गड-कौलगे शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-कौलगे शाळा
गड-कौलगे शाळा

गड-कौलगे शाळा

sakal_logo
By

gad44.jpg
73192
कौलगे : पुस्तकांचे निरीक्षण करताना न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी.
--------------------------
कौलगे शाळेला 300 पुस्तकांची भेट
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलला आर्ट ऑफ लिव्हिंग सलग्न आयएएचव्ही रिडलायब्ररी संस्थेमार्फत 300 पुस्तकांची भेट देण्यात आली. सुमारे 45 हजारांची ही पुस्तके आहेत. संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयक पूजा माळी, सुरेश पाटील, प्रा. नितीन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तकांच्या कक्षाचे उद्घाटन झाले. मुख्याध्यापिका सौ. एस. एस. इनामदार यांनी स्वागत केले. ग्रंथालय विभाग प्रमुख विश्वजित चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. पूजा माळी, सुरेश पाटील, माजी सरपंच रामचंद्र पोवार, विलास कुलकर्णी, साक्षी पोवार यांची भाषणे झाली. सुनील माने यांनी सूत्रसंचालन केले. बळीराम पाटील यांनी आभार मानले. दरम्यान, देणगी मिळालेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडले होते. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचे निरीक्षण केले.