गड-चव्हाण अमृतमहोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-चव्हाण अमृतमहोत्सव
गड-चव्हाण अमृतमहोत्सव

गड-चव्हाण अमृतमहोत्सव

sakal_logo
By

रामचंद्र चव्हाण यांचा
रविवारी अमृतमहोत्सव
गडहिंग्लज, ता. 5 : चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथील रामचंद्र चव्हाण यांचा अमृतमहोत्सव रविवारी (ता.8) कार्यक्रम होणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे. आमदार राजेश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश टोपे, खासदार संजय मंडलिक यांच्यासह माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, श्रीपतराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोडसाखरचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, राष्ट्रवादीचे चंदगड विधानसभा अध्यक्ष रामाप्पा करिगार, चंदगडचे अध्यक्ष भिकू गावडे, आजऱ्याचे अध्यक्ष मुकूंद देसाई, गडहिंग्लजचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. चन्नेकुप्पी येथील बी. आर. चव्हाण इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर सायंकाळी चारला हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन माजी सरपंच उदय चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, सरपंच सुनीता पाटील यांनी केले आहे.