ब्लॅक स्पॉट कमी करण्याचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लॅक स्पॉट कमी करण्याचे आव्हान
ब्लॅक स्पॉट कमी करण्याचे आव्हान

ब्लॅक स्पॉट कमी करण्याचे आव्हान

sakal_logo
By

सावधान ! शहरात १६ ठिकाणी धोका
‘ब्लॅक स्पॉट’वर उपाय आवश्‍यक; वाहनधारकांकडूनही हवी काळजी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : काही दिवसापूर्वी रंकाळा टॉवर परिसरात अपघात महिला ठार झाली. कोयास्को चौक (टेंबलाई उड्डाणपूल) परिसरात डंपर चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली. अज्ञात वाहन चालकाने काल दुचाकीस्वाराला धडक देऊन पसार झाला. शहरात अशा १६ ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यामुळे त्यांची नोंद ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघाताची ठिकाणे) म्हणून झाली आहे. शहरातील अपघात कमी करण्यासाठी ठोस उपाय आणि जनजागृती महत्त्‍वाची असल्याचे दिसून येते.
रोज वाढणारी वाहने, पर्यटकांची वाढ आणि अरुंद रस्ते आणि अतिक्रमणे याचा फटका वाहतुकीला बसत आहे. कोयास्को चौकात वाहतूक नियंत्रण शाखेचा पोलिस नसले तर भरधाव वेग, चारही बाजूंनी येणारी वाहने यामुळे तो धोकादायक बनला आहे. रंकाळा टॉवर येथेही महिलेचा अपघाती मृत्यू झाला. हे दोन्ही चौक ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत. येथे वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरुपी पोलिस, सीसीटीव्ही, सिग्नल सुरू पाहिजे. पार्किंग पट्ट्याच्या आत पाहिजे. झेब्रा क्रॉसिंगसह वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी आवश्‍यक उपाय योजना महापालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून होणे अपेक्षित आहेत. तसेच वाहनधारकांनीसुद्धा ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी वाहने सावकाश चालविणे, वाहतुकीचे सर्व नियम पाळणे आवश्‍यक आहे.
-----------
कोट
ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात अशा ठिकाणांचा समावेश ‘ब्लॅक स्पॉट’मध्ये केला जातो. तेथे अपघात होऊ नये म्हणून काही उपाय योजना केल्या जातात. शहरातील ब्लॅक स्पॉट कायमस्वरुपी कमी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- स्नेहा गिरी, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा
-------------
चौकट
पोलिस ठाणे निहाय ‘ब्लॅक स्पॉट’
राजारामपुरी पोलिस ठाणे
- सायबर चौक ते एनसीसी भवन
- शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोल नाका
- कोयास्को चौक ते शिवाजी विद्यापीठ
- कमला कॉलेज समोरील रस्ता आणि बागल चौक
- राजेंद्रनगर ते उद्यमनगर, सुभाषनगर रोड
-----------
लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे
- उमा टॉकीज ते टायटन शोरूम
- शिवाजी पुतळा ते सीपीआर चौक
- सीपीआर चौक ते टायटन शोरूम
- शिवाजी पूल ते दसरा चौक
-----------
शाहूपुरी पोलिस ठाणे
- कसबा बावडा भगवा चौक ते शिये टोल नाका
- दाभोळकर चौक ते ताराराणी चौक
- ताराराणी चौक तावडे हॉटेल चौक
- व्हिनस चौक ते दाभोळकर चौक
----------------
जुनाराजवाडा पोलिस ठाणे
- रंकाळा टॉवर चौक ते ‘डी’ मार्ट शालिनी पॅलेसपर्यंत
- उमा टॉकीज ते गोखले कॉलेज चौक
- क्रशर चौक (रंकाळा ते सानेगुरुजी वसाहत)