
आजरा ः छेडछाड प्रकरणाचा निषेध
छेडछाड प्रकरणी मुस्लिम
समाजातर्फे निषेध; तहसीलदारांना निवेदन
आजरा ः आजऱ्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुलीची छेडछाड प्रकार हा निंदनीय आहे. या प्रकरणाचा जाहीर निषेध करीत आहोत. ज्या कोणी हे कृत्य केले आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार विकास अहिर यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, ‘आजरा तालुक्यात सर्वधर्मिय लोक एकत्रित व गुण्यागोविंदाने राहतात. अशातच दोन दिवसांपूर्वी अज्ञाताकडून मुलीची छेड काढणेचा प्रकार घडला. हा प्रकार निंदनीय आहे. या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत. तसेच दोषींचा शोध घेवून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून केली. निवेदनावर मंजूर मुजावर, अॅड. जावेद दीडबाग, नगरसेविका यासीराबी मुजावर, इम्रान सोनेखान, यूनस माणगावकर, अ.रजाक माणगावकर, अहमद मुराद, महमदअली मुजावर, इब्राहिम इंचनाळकर, सलाम काकतीकर, अमानुल्ला आगलावे, सिद्दीका लमतुरे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.