व्यापारी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापारी बैठक
व्यापारी बैठक

व्यापारी बैठक

sakal_logo
By

गूळ सौदे आजपासून सुरू होणार
-
अडते, व्यापारी, शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर, ता. ५ ः माथाडी कामगार ५० टक्के मजुरी वाढ देण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने शाहू मार्केट यार्डातील गूळ सौद्याचा पेच निर्माण झाला. यावर पर्याय म्हणून अन्य बाजारपेठातील माथाडी आणून शुक्रवार (ता.६) पासून गूळ सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहूपुरी व्यापारी असोसिएशनमध्ये गूळ अडते, व्यापारी व शेतकरी यांची सायंकाळी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
यार्डातील गुळाच्या घाऊक बाजारपेठेत माथाडींनी काम बंद आंदोलन केल्याने सौदे बंद पडले. मात्र, शेतकरी गूळ बाजारात आणत आहेत, मात्र तो गूळ उतरणे भरण्याचे काम ठप्प झाले. परिणामी शेतकऱ्यांचा गूळ पडून आहे. व्यापाऱ्यांनी सौद्यात खरेदी केलेला केलेला गूळ पुढील बाजार पेठेत पाठवण्याचे कामही ठप्प झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचेही नुकसान होत आहे. अशात माथाडी कामगार मागणीवर ठाम राहिल्याने गूळ सौदे सुरू होणे मुश्कील झाले. यावर पर्याय काढण्यासाठी व्यापारी, अडते, शेतकरी यांनी एकत्र बैठक घेतली. त्यात अन्य बाजार पेठेतील माथाडी आणून गूळ रवे उतरणे, भरणे, वजन करण्याचे काम होईल. त्यासाठी बाजार समितीनेही सहकार्य करावे, अशा मागणीचे पत्र व्यापाऱ्यांनी बाजार समितीला सायंकाळी दिले. बाजार समितीनेही माथाडी बोर्डाने गूळ सौद्यासाठी माथाडी पुरवावेत, अशा मागणीचे पत्र सायंकाळी दिले.

माथाडीना नोटीस
गुळ सौदे नियमित सुरू असताना अचानकपणे काम बंद आंदोलन केल्याने शेतकरी, व्यापारी घटकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आपले परवाने रद्द करा करू नयेत याचा खुलासा करावा अशा आशयाची नोटीस बाजार समितीने २७७ माथाडीना दिली आहे तसेच नोटीसीची माहिती माथाडी बोर्डालाही दिली आहे. त्यानुसार दोन दिवसात माथाडी कामगारांना या नोटीसीला उत्तर द्यावे लागणार आहे.