विद्यापीठ परीक्षा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ परीक्षा बातमी
विद्यापीठ परीक्षा बातमी

विद्यापीठ परीक्षा बातमी

sakal_logo
By

विधि शाखेची परीक्षा १८ जानेवारीला
प्रश्नपत्रिकेतील बदलामुळे परीक्षा विभागाचा निर्णय

कोल्हापूर, ता. ५ ः बहुचर्चीत विधी शाखेच्या परीक्षेवर अखेर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने शिक्कामोर्तब केले. ही परीक्षा आता १८ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबातची माहिती आज परीक्षा विभागाने जाहीर केली. अन्य विभागांच्या परीक्षा आज नियमित वेळापत्रका प्रमाणे झाल्या.
विधि शाखेच्या परीक्षांच्या तारखांबद्दल संभ्रम होता. काही विद्यार्थी परीक्षेच्या कारणावरून उच्च न्यायालयातही गेले होते. त्यामुळे विधि शाखेच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. बुधवारी (ता.४) विद्यार्थ्यांनी याचिका मागे घेतली. दरम्यान, विधि विभागाच्या परीक्षेबद्दल दोन दिवसांपूर्वी विधी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक झाली होती. यामध्ये परीक्षा पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाली होती. आज विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने ६ जानेवारीपासून सुरू होणारी विधि शाखेची परीक्षा १८ जानेवारीपासून होणार असल्याचे जाहीर केले.
दरम्यान आज बी.ए. (ड्रेस मेकिंग अँड फॅशन कोऑर्डिनिशन), बी.व्होक (सस्टेनेबन ॲग्रिकल्चर), बी.व्होक (सस्टीनेबल ॲग्रिकल्पच मॅनेजमेंट), एम.एस.डब्ल्यू, बी.व्होक (फुड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी) बी.व्होक (नर्सिंग), बी.व्होक (टुरिझम अँड सर्विस इंडसट्री), बी.व्होक ॲटोमोबाईल, बी.व्होक (प्रिंटींग अँड पब्लिशिंग), बी.एस.सी बायोटेक्नॉलॉजी या शिवाय एम.ए., बी.ए., बीबीए, बीसीए या शाखांच्या विविध विषयांच्या परीक्षा झाल्या.

चौकट
प्रश्नपत्रिकेत चुका
विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षेमध्ये बुधवारी (ता.४) बी.ए.मराठीच्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा झाली. यामध्ये प्रश्नपत्रिकेत काही चुका होत्या. तीनपैकी दोन प्रश्नांची उत्तरे द्या, असे लिहिले होते. मात्र, प्रत्यक्षात दोनच प्रश्ने होते. आज झालेल्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये महदंहबा असा पर्याय अपेक्षित होता. त्याऐवजी महदेवा असे छापून आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतही गुणांचा घोळ झाला होता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.