३३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३३
३३

३३

sakal_logo
By

निश्चयाचा महामेरू
किंवा
शब्द पाळणारा नेता

पक्षनिष्ठेचा आदर्श घ्यावा, तो पी. एन. पाटील यांच्याकडूनच. काँग्रेसवर अपार निष्ठा ठेवत कार्यकर्त्यांचा मोठा प्रवाह असणारे नेतृत्व म्हणून पी. एन. पाटील यांची जिल्ह्याच्या राजकीय पटलावर तसेच सामाजिक व सहकार क्षेत्रात ओळख आहे. कार्यकर्ता असो, वरिष्ठ नेते वा सहकारी... त्यांना पी. एन. पाटील यांनी दिलेला शब्द ते बदलत नाहीत. अडचणी आल्या, तरी ते दिलेल्या शब्दांशी फरकत घेत नाहीत. लहान-मोठे कार्यकर्ते एकत्र करून त्यांनी जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष मजबूत केला आहे.

‘निश्चयाचा महामेरू बहुतजनांसी आधारू...’ काव्यपंक्तीप्रमाणे पी. एन. पाटील यांनी सहकार आणि राजकीय क्षेत्रात काम करताना कार्यकर्त्यांच्या पाठबळावर जिल्ह्यात काँग्रेस सक्षम करण्याचे शिवधनुष्य हातात घेतले. शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या सहकारी संस्था सक्षम करण्यासाठी त्यांनी राजकारणाचा वसा अंगीकारला. भोगावती काठावरील शेतकरी केंद्रबिंदू मानून भोगावती कारखान्याच्या कार्यक्षेत्राबरोबर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे ठरवले आणि ४ ते ५ वर्षी भोगावतीसारख्या अडचणीतील सहकारी साखर कारखान्याची धुरा हाती घेतली. हे काम करताना शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना राबवण्याचा मानस असून ‘प्रयोगशाळेतून शेतीकडे’ तत्त्वाने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान देऊन उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नवाढीचा मूलमंत्र कसा देता येईल, यासाठी धडपड केली. कामगारांनाही कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे वागणूक देऊन त्यांच्या हक्काच्या बाबींची पूर्तता करून तसेच कामाचे ठिकाणी उत्तम सोय करून कामाची गुणवत्तावाढीकडे लक्ष दिले. कामगार राधानगरी आणि करवीर या दोन तालुक्याचे मोठे क्षेत्र असलेल्या कारखान्याचे सुरक्षा कवच आहे, असे त्यांच्या निर्णयातून स्पष्ट होते.कामगारांना सुविधा कशा मिळतील, याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातून येणाऱ्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील कार्यकर्त्यांकडे तळमळीने लक्ष देऊन त्यांच्या कामात हिरिरीने भाग घेऊन ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची तळमळ कार्यकर्त्यांना दिसते; म्हणूनच शेतकऱ्यांसह कार्यकत्यांना त्यांच्या पंखात बळ येण्यासाठी आणि त्यांची पाखर अशीच राहण्यासाठी परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो, अशा त्यांच्या वाढदिनी प्रार्थना करतो. त्यांच्या निःस्वार्थी, निरपेक्ष वृत्तीने युवकांच्या पाठबळावर काँग्रेस पक्ष बळकट होईल, यात शंकाच नाही. म्हणून असंख्य कार्यकर्ते साहेबांच्या उदंड आयुष्यासाठी परमेश्वराकडे सदैव प्रार्थना करतील.

73520
- एकनाथराव पाटील, हसूरकर