करवीर तहसिल आणि ठाणे स्थलांतर होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवीर तहसिल आणि ठाणे स्थलांतर होणार
करवीर तहसिल आणि ठाणे स्थलांतर होणार

करवीर तहसिल आणि ठाणे स्थलांतर होणार

sakal_logo
By

करवीर ‘तहसील’ बीटी कॉलेजमध्ये

पंधरा दिवसांत स्थलांतर ःपोलिस ठाणे बावड्यातील भगवा चौकात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः करवीर तहसील कार्यालय शाहूपुरीत तर करवीर पोलिस ठाणे कसबा बावड्यात स्थलांतर होत आहे. सध्या असलेल्या कार्यालयांच्या इमारत बांधकामाचे काम लवकरच सुरू होत आहे. करवीर तहसील कार्यालयाचे स्थलांतर सुरू झाले असून अवघ्या दहा- पंधरा दिवसांत ते संपूर्ण स्थलांतर होईल.
भाऊसिंगजी रोडवरील करवीर तहसील कार्यालयाची इमारत खूप जुनी आहे. तेथे असलेला नागरिकांचा राबता आणि इमारत यांचा विचार करता इमारतीचे नूतनीकरण आवश्यक होते. इमारतीचा आराखडा तयार झाला असून लवकर बांधकाम सुरू होणार आहे. इमारत बांधकाम पूर्ण होईपर्यंत करवीर तहसील कार्यालय शाहूपुरीतील बीटी कॉलेजमध्ये स्थलांतर होत आहे. त्याचे साहित्य हलविण्याचे काम सुरू झाले आहे. करवीर पोलिस ठाण्याचे स्थलांतर कसबा बावड्यातील भगवा चौकात होणार आहे. तेथील जुन्या पोलिस लाईनमध्ये ठाणे स्थलांतर होत आहे. त्याची सुरुवात अद्याप झाली नसली तरी ती देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. करवीर तहसील कार्यालयाच्या जागेवर साधारण पुढील महिन्यात बांधकाम सुरू होण्याची शक्यता असल्याचे करवीर तहसीलदार शीतल मुळे-भांबरे यांनी सांगितले.