Tue, Jan 31, 2023

शाहुपुरी पतसंस्था
शाहुपुरी पतसंस्था
Published on : 7 January 2023, 12:05 pm
शाहूपुरी व्यापारी पतसंस्था बिनविरोध
कोल्हापूर ः येथील शाहूपुरी व्यापारी नागरी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी. एम. इंगवले यांनी काम पाहिले. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून राजेंद्र सखाराम पाटील, अनिल रामचंद्र पाटील, प्रशांत शशिकांत शिंदे, विकास कृष्णा केसरकर, जोती रामा घेवडे, वसंत बापूसो वळके, नामदेव निवृत्ती रेवडकर यांची बिनविरोध निवड झाली. महिला प्रतिनिधी गटातून सुजाता कदम व सुखदा भाट, अनुसूचित जाती गटातून अनिल वासुदेव कांबळे, भटक्या विमुक्त गटातून गोपीनाथ डवरी, तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून संजय श्रीनिवास पतंगे हे बिनविरोध विजयी झाले.