श्रीमंत शाहू महाराज वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीमंत शाहू महाराज वाढदिवस
श्रीमंत शाहू महाराज वाढदिवस

श्रीमंत शाहू महाराज वाढदिवस

sakal_logo
By

73822, 73815, 73816
...

नवीन राजवाड्यावर लोटला जनजागर

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः लेझीम, ढोल-ताशांचा निनाद, पोलिस बॅंड, कमांडो फोर्स, बुलेटचा थाट, कोल्हापुरी फेट्याचा बाज आणि आपापल्या परीने शुभेच्छा देण्यासाठी आसुसलेली मनं... अशा संमोहित माहौलात आज नवीन राजवाडा परिसर न्हाऊन निघाला. निमित्त होते, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे. सकाळी साडेनऊपासून दुपारी दीडपर्यंत शाहू महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी येथे अक्षरशः जनसागर लोटला.
सकाळी साडेनऊच्या सुमारास नवीन राजवाड्यापासून छत्रपती शाहू विद्यालयापर्यंत जीपमधून शाहू महाराज यांचे मिरवणुकीने स्वागत झाले. पोलिस बॅंड, ‘एनसीसी‘चे छात्र आणि तारा कमांडा फोर्सच्या जवानांनी त्यांना शिस्तबद्ध मानवंदना देत शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. छत्रपती घराण्यातील सदस्यांबरोबरच कॅप्टन शिवाजीराव महाडकर, संग्रामसिंह भोसले, प्रवीणसिंह घाटगे, बाळ पाटणकर, प्राचार्य राजश्री पाटील, ‘केएसए‘चे सचिव माणिक मंडलिक आदी या वेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिला यंदाचा ‘एक्सलन्स ॲवॉर्ड’ या वेळी देण्यात आला. छत्रपती शाहू विद्यालयाच्या ‘आपले महाराज’ या विशेष अंकाचे प्रकाशन या वेळी शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. कऱ्हाड ते कोल्हापूर सायकल प्रवास करणाऱ्या विद्यालयाचा विद्यार्थी गुरुप्रसाद मोरे याचाही या वेळी सत्कार झाला. कर्नल विजयसिंह गायकवाड, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, अजित नरके, माजी खासदार निवेदिता माने, वैभव नायकवडी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, अभयकुमार साळुंखे, प्रदीपभाई कापडिया, माजी आमदार सत्यजित पाटील, विश्वविजय खानविलकर, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, नायब तहसीलदार वैभव नावडकर, आर्किटेक्ट अभिजित जाधव-कसबेकर, विश्वजित जाधव, मानसिंग बोंद्रे, जयेश ओसवाल, अभिजित मगदूम, फत्तेसिंह जाधव, चेतन चौगुले, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष के. जी. पाटील, दिलीप पवार, मेघा पानसरे, व्यंकाप्पा भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजेश लाटकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, पारस ओसवाल, डॉ. संदीप पाटील, सई खराडे, अजित खराडे, इंद्रजित नागेशकर, राजू मेवेकरी, अभिजित तायशेटे, सतीश सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, संदीप देसाई, कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे प्राचार्य अजय दळवी, विजय टिपुगडे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, शाहीर विशारद आझाद नायकवडी, किसन भोसले, दिग्विजय राजेभोसले, ॲड. गुलाबराव घोरपडे, राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, जैन बोर्डिंगचे सुरेश रोटे, संजय शेटे, भय्या माने, मधुकर रामाणे, शारंगधर देशमुख आदींसह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
.............
सर्वच घटकांकडून शुभेच्छा
समाजातील सर्वच घटकांनी शुभेच्छा देण्यासाठी नवीन राजवाड्यावर एकच गर्दी केली. शहरातील विविध संस्था, संघटनांसह बोर्डिंगचे पदाधिकारी, शाळकरी मुलांपासून ते जोतिबा डोंगरावरील पुजाऱ्यांपर्यंत सारे घटक यानिमित्त एकवटले.
..........
73879
रक्तातून साकारले पेंटिंग
कसबा बावडा येथील चित्रकार व मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे यांनी शाहू महाराजांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. त्यांनी स्वतःच्या रक्तातून शाहू महाराजांचे पेंटिंग साकारले.
.............
भोई समाजातर्फे
‘बालकल्याण’ला १५ हजार
शाहू महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भोई समाजातर्फे बालकल्याण संकुलाला १५ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. समाजाचे अध्यक्ष सोपान कानोजे, नामदेव तिकोणे, जयसिंग झिटे, गणपतराव भोई, सुभाष आयरे, आनंदराव जाधव, रवींद्र आयरे, राजेंद्र ठोंबरे, सुनील घाग, संगीता नलवडे, वर्षा मुळे, दिलीप नलवडे, दत्तात्रय कनोजे, रामदास शिंदे, संजय काटकर आदी या वेळी उपस्थित होते.