संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

73891
वीरशैव समाजातर्फे
सिद्धेश्वर महास्वामींना आदरांजली
कोल्हापूर ः सिद्धेश्वर महास्वामींच्या निधनाने वीरशैव समाजाची हानी झाली आहे. सिद्धेश्वर महास्वामींचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे, अशा भावना व्यक्त झाल्या. वीरशैव समाजातर्फे अक्कमहादेवी मंडपात आदरांजली सभा झाली. यावेळी समाजबांधवांनी मनोगते व्यक्त केली. आमदार जयश्री जाधव, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल स्वामी, ज्येष्ठ संचालक राजेश पाटील- चंदुरकर, समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, उपाध्यक्ष चंद्रकांत स्वामी, सचिव राजू वाली, चंद्रकांत हळदे, एडवोकेट सतीश खोतलांडे, राहुल नष्टे ,सूर्यकांत वडगावकर, किरण सांगावकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बोधले, उपाध्यक्षा सुजाता विभूते, संगीता करंबळी, स्मिता हळदे, शकुंतला बनछोडे, सुनंदा नष्टे, सुनंदा शेटे उपस्थित होते.
.............
`फ्रॅक्चर्ड फ्रीडम''
पुस्तकावर उद्या मुक्त संवाद
कोल्हापूर ः येथील श्रमिक प्रतिष्ठान, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेसह विविध संस्थांतर्फे सोमवारी (ता. ९) कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम'' पुस्तकावर मुक्तसंवाद होणार आहे. पुस्तकाच्या अनुवादक अनघा लेले यांची प्रमुख उपस्थिती असेल. राजर्षी शाहू स्मारक भवनातील मिनी हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर असतील. डॉ. राजन गवस, गणेश विसपुते संवादक असतील. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
......
सांगवडेकर सेवा
प्रतिष्ठानतर्फे आवाहन
कोल्हापूर ः श्री सदगुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने १८ जानेवारीपासून सदगुरू विश्वनाथ महाराज रूकडीकर पुण्यस्मरण सोहळा आहे. यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होईल. ज्यांना पारायण सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी पंधरा जानेवारीपर्यंत नावे विश्वपंढरीत ट्रस्टच्या कार्यालयात नोंदवावीत, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.
..........
73890
निवृत्ती चौकातील
सभा मंचची स्वच्छता
कोल्हापूर ः अखिल भारत ब्राम्हण महासंघ व आर्य श्रमिक संघटनेतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उपक्रम झाले. निवृत्ती चौकातील दुरवस्था झालेल्या सावित्रीबाई फुले सभा मंचाची स्वच्छता व डागडुजी केली. महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी, सरोज फडके, निर्मला कुराडे, ज्योती काटवे, वर्षा जाधव, आशा सावंत, राधा सावंत, सिंधू काशीद, शुभांगी भेंडवडे आदी उपस्थित होते.
..........
73889
दत्तात्रय कांबळे यांचा सत्कार
कोल्हापूर ः तांबाळे येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल गंगापूर (ता. भुदरगड) येथील श्रीराम हायस्कूलचे शिक्षक दत्तात्रय कांबळे यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार झाला. यावेळी माजी मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
...........
वीरशैव पतसंस्थेची
निवडणूक बिनविरोध
कोल्हापूर ः येथील श्री वीरशैव बॅंक सेवकांच्या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पंधरा जागांसाठी पंधराच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक अधिकारी सी. एस. माळी यांनी निवडणूक बिनविरोध जाहीर केली. नूतन संचालक मंडळात अनिल चौगुले, नारायण माळी, सुहास माळी, अतुल माळी, सुनील विभूते, सुधीर कोळी, पंकज पाटील, नितीन चरणकर, समीर माळकर, अभिजीत पाटील, प्रवीण चौगुले, राहुल पांढरे, शिवानंद स्वामी, महादेवी वाळवेकर, सुचित्रा पाटील यांचा समावेश आहे.