
विश्व संमलेन
74109
कोल्हापूरच्या शिवकालीन युद्धकलेने
गाजवले विश्वमराठी संमेलन
कोल्हापूर, ता. ८ ः मुंबईत झालेल्या विश्वमराठी संमेलनात येथील शिवाजी पेठेतील श्री खंडोबा वेताळच्या ठोंबरे वस्ताद आखाड्याने युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली. शाहीर मिलिंद सावंत यांच्या शाहिरीबरोबरच शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी सर्वजण भारावून गेले. सर्व कलाकारांच्या भेटी घेऊन त्यांचे कौतुकही केले. संघामध्ये वस्ताद बाळासाहेब शिकलगार, संघनायक किरण जाधव, सुरेश बुगडे, संतोष अधिक, शिवबा सावंत, स्वरूप पाटील, केदार ठोंबरे, साईश साळुंखे, तन्मय शेठ, विश्वजित जाधव, शिवानी ठोंबरे, रेणू व मनीषा पडळकर, अनघा व समीधा चौगुले आदींचा सहभाग होता. पोपट वाघे, अशोक लोखंडे, साताप्पा लोखंडे, संकेत लोखंडे, गुलाब लोखंडे यांनी संगीत साथ केली. पालकमंत्री दीपक केसरकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, संयोजन समितीचे पाटुकले यांनी विशेष आभार मानले.