सीमा प्रश्नी शरद पवारांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीमा प्रश्नी शरद पवारांना निवेदन
सीमा प्रश्नी शरद पवारांना निवेदन

सीमा प्रश्नी शरद पवारांना निवेदन

sakal_logo
By

फोटो
....


सीमाप्रश्नाच्या खटल्याबाबत राज्य सरकारशी चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ ः ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. नजीकच्या काळात याची सुनावणी सुरू होणार आहे. यामध्ये हा प्रश्न निकाली निघाला तर ती समाधानाची बाब ठरेल. यासाठी आम्ही ज्या कायदेशीर बाबींची पूर्तता करायची आहे, त्याबद्दल राज्य सरकारबरोबर चर्चा केली आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेली अनेक वर्षे चिघळत पडला आहे. गेल्या महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी याबाबत विवादास्पद विधान केले होते. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीच्या तपशिलाबाबत विचारले असता पवार म्हणाले, ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबद्दल मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी आमच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत या प्रश्नाच्या कायदेशीर बाबींबद्दल चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशी याबाबत चर्चा करावी, असे आम्ही सरकारला सुचवले. नजीकच्या काळात सीमाप्रश्नाच्या याचिकेवर सुनावणी सुरू होईल. यामध्ये हा प्रश्न निकाली निघाला, तर ती समाधानाची बाब असेल.’
पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळात माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगळे, एम. जी. पाटील, सुनील आनंदाचे यांचा समावेश होता.
----------------------------------------