गडहिंग्लजला आज क्रीडा प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला आज क्रीडा प्रदर्शन
गडहिंग्लजला आज क्रीडा प्रदर्शन

गडहिंग्लजला आज क्रीडा प्रदर्शन

sakal_logo
By

गडहिंग्लजला आज क्रीडा प्रदर्शन
गडहिंग्लज : येथील विद्या प्रसारक मंडळ व डॉ. घाळी प्रतिष्ठानतर्फे माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त क्रीडा दालन प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. उद्या (ता. १०) दुपारी अडीचला जागृती हायस्कूलच्या मैदानावर प्रदर्शनाचा प्रारंभ होईल. डॉ. एम. एस. बेळगुद्री, डॉ. दिलीप माळवे, डॉ. किरण पाटील, डॉ. अमर पेडणेकर यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी अध्यक्षस्थानी असतील. सहायक क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, प्रो कबड्डीचा स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई, आंतरराष्ट्रीय दिव्यांग टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार, राष्ट्रीय फुटबॉल पंच अंजना तुरंबेकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त बेसबॉल खेळाडू गिरीजा बोडेकर, राष्ट्रीय बेसबॉल प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती आहे. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सतीश घाळी यांनी केले आहे.
----------------------------
गडहिंग्लजला चित्रकला स्पर्धा
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. कलाशिक्षक रमन लोहार यांनी प्राचार्य पंडित पाटील यांचे स्केच करून स्पर्धेचे उद्‍घाटन केले. राजाराम जगदाळे यांनी स्पर्धेचे नियोजन केले.
------------------------
जनस्वास्थ अभियानची सांगता
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील पार्वती हायस्कूलमध्ये जनस्वास्थ दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे राबवलेल्या जनस्वास्थ अभियान सप्ताहाची सांगता झाली. विद्यार्थ्यांकडून आरोग्य व पर्यावरण या विषयावर पोस्टर्स तयार करून घेतली. जनस्वास्थ्य प्रतिज्ञा दिली. टाकाऊ अन्नपदार्थांपासून बायोगॅस निर्मितीबाबत प्रबोधन केले. पर्यावरणपूरक भारतीय सण साजरे करणे, ध्वनी प्रदूषण रोखणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन आदीबाबत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, गणपती पाटील, उमेश सावंत, बाळू कुंभार, वैशाली रेपाळ यांचे सहकार्य मिळाले.