रेशन धान्य दुकानदार निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेशन धान्य दुकानदार निवेदन
रेशन धान्य दुकानदार निवेदन

रेशन धान्य दुकानदार निवेदन

sakal_logo
By

L74423
रेशन धान्य दुकानदारांना
ठोस मानधन द्या
कोल्हापूर ः रेशन धान्य दुकानदारांना ठोस मानधन द्या. त्यांचे कमिशन वाढवा यासह विविध मागण्या रेशन धान्य दुकानदार महासंघाने केल्या आहेत. आपल्या मगाण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले. जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी ते स्विकारले. निवेदनातील माहितीनुसार, सर्व रेशन धान्य दुकानदारांना कमिशन वाढवून द्या. तसेच ठोस मानधन द्या. डिसेंबर महिन्याचे पीएमजीकेवाय योजनेतील धान्य मिळावे. या योजनेतील वाटून झालेल्या मोफत धान्याचे ‘मार्जिन मनी’ तात्काळ मिळावा. ही योजना आणखी एक वर्षे चालणार असल्याने मार्जिन मनी आधीच मिळावा. अन्यथा दुकानात अनेक अडचणी निर्माण होतील. रेशन दुकानात तेल, डाळी, साखर या जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्याव्यात त्यामुळे दुकान चालवण्यास मदत होईल. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात महासंघाचे अध्यक्ष रवींद्र मोरे, गजानन हवलदार, दीपक शिराळे, अरुण शिंदे, सचिव चव्हाण, संजय चौगुले, प्रवीण पाटील, बंडा सावेकर, विश्वनाथ कदम, सुरेश पाटील, अशोक शेटे, सुधीर चौगुले यांचा समावेश होता.