Thur, Feb 2, 2023

मोबाईल ॲप डाऊनलोड
मोबाईल ॲप डाऊनलोड
Published on : 10 January 2023, 3:53 am
पन्नास लाखांहून अधिक ग्राहकांकडून
महावितरणचे मोबाईल ॲप डाउनलोड
कोल्हापूर : महावितरणचे मोबाईल ॲप पन्नास लाखांहून अधिक ग्राहकांनी डाऊनलोड केल्याची माहिती पुढे आली आहे. ॲप सतत वापरणाऱ्यांची संख्या २८ लाखांपेक्षा अधिक आहे. एकूण ग्राहकांच्या तुलनेत दहापैकी एक ग्राहक ॲप नियमित वापरत आहे. विजेचे बिल भरण्यासाठी एप्रिल २०२१ ला १० लाख ९७ हजार रुपयांचे व्यवहार झाले, तर १५८ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली. नोव्हेंबर २०२२ मध्ये व्यवहारांची संख्या १५ लाख ८९ हजार झाली. तसेच २३७ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली. ॲपवरून होणाऱ्या व्यवहारांची संख्या ४४ टक्के, तर बिलांच्या रकमेचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे.