शिवसेना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना निवेदन
शिवसेना निवेदन

शिवसेना निवेदन

sakal_logo
By

मठ तालीम निधीबाबत
संजय पवार अज्ञानी

रणजित जाधव; तोडपाणी आंदोलन बंद करा
.............
कोल्हापूर, ता. १० : शनिवार पेठेतील मठ तालीम सार्वजनिक न्यास विभागाकडे नोंदणीकृत्त संस्था आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार अज्ञानी असून त्यांनी तोडपाणी आंदोलने बंद करावीत, असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे शहरप्रमुख रणजित जाधव यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.
निधी मंजुरीची अपुरी माहिती आणि प्रसिद्धीसाठी विकासकामांविरोधात आंदोलन करणाऱ्या पवार यांच्या बुद्धीची कीव येते. संस्थेची जागा संस्थेच्या स्वमालकीची आहे. पण, खासदारकीचे तिकीट मिळालेल्या श्री. पवार यांना राज्यसभा खासदारांच्या निधी वितरणाबाबतीत माहिती नसणे, निधी मंजुरीबाबत शासकीय नियमांची कल्पना नसणे, यावरूनच अज्ञानीपणाची झलक दिसते, असेही पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी व तोडपाण्यासाठी आंदोलने करायची, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे हेच उद्योग पवार आणि टोळक्याने आजपर्यंत केले. त्यांनी माहिती न घेता आंदोलन करून स्वत:चे हसे करून घेतले. त्यांच्या अज्ञानामुळेच खासदारकीला त्यांचा पराभव झाला असावा, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असेही म्हटले आहे. कोल्हापूरच्या विकासाच्या कोणत्याही विकासकामात पवार आणि त्यांच्या टोळक्याने तोडपाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यास सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशाराही श्री. जाधव यांनी दिला.