गड-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-संक्षिप्त
गड-संक्षिप्त

गड-संक्षिप्त

sakal_logo
By

जनता दलाची आज बैठक
गडहिंग्लज : संकेश्वर-बांदा रस्त्याबाबत जनता दलातर्फे उद्या (ता. १२) घरमालक, व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. पालिकेच्या शाहू सभागृहात दुपारी बाराला बैठक होईल. संकेश्वर-बांदा रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. शहरासह इतर गावांतून जाणाऱ्या रस्त्यामुळे नुकसान होणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आहे. माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होईल. बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी केले आहे.
--------------------------
gad111.jpg
74689
गडहिंग्लज : जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना डॉ. घाळी. व्यासपीठावर डॉ. एस. एन. शिंदे, प्रा. सुनील देसाई.
-------------------------
‘जागृती शिक्षणशास्त्र’च्या नवागतांचे स्वागत
गडहिंग्लज : येथील जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थींचे स्वागत झाले. कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे यांनी स्वागत केले. डॉ. घाळी म्हणाले, ‘नवीन अध्यापन पद्धती, तंत्रे आत्मसात करा. विषयज्ञान व आशयज्ञान यामध्ये अपडेट राहणे आवश्यक आहे.’ प्रा. एस. बी. मगदूम, प्रशिक्षणार्थी अक्षय वेदांते यांची भाषणे झाली. प्रशासन अधिकारी सुनील देसाई, प्रा. आऱ. बी. पाटील, प्रा. ए. एम. नवले, प्रा. एस. एस. जाधव, अनिल दड्डी, विकास बुरुड, अमर लोखंडे उपस्थित होते. आदिती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली जाधव यांनी आभार मानले.
--------------------------
‘शिंदे शिक्षणशास्त्र’मध्ये संयुक्त कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील दिनकरराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थींचे स्वागत व पालक मेळावा असा संयुक्त कार्यक्रम झाला. जे. वाय. बारदेस्कर अध्यक्षस्थानी होते. प्रा. एस. जे. घाटगे यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. डॉ. बी. डी. पाटील यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. प्राचार्य डॉ. एस. एम. रायकर यांनी यांनी शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम प्रशिक्षणार्थींना भविष्य घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. श्री. बारदेस्कर यांनी सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. मुले आपल्यापेक्षा हुशार असतात. याचा विचार करुन अध्यापनाचे काम केले पाहिजे, असे सांगितले. प्रशिक्षणार्थी सोनल गिलबिले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. एस. खोचगे यांनी आभार मानले.
-------------------------
gad112.jpg
74690
गडहिंग्लज : भित्तीपत्रक प्रकाशनप्रसंगी डॉ. मंगलकुमार पाटील, अनिल उंदरे, डॉ. सरोज बिडकर आदी.
--------------------
घाळी महाविद्यालयात हिंदी दिन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात विश्व हिंदी दिन झाला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर अधारित भित्तीपत्रक तयार केले होते. त्याचे प्रकाशन प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते झाले. विभागप्रमुख डॉ. सरोज बिडकर यांनी स्वागत केले. उपप्राचार्य अनिल उंदरे, डॉ. दयानंद पाटील, कार्यालयीन अधीक्षक हरिभाऊ पन्हाळकर उपस्थित होते.
-------------------------
प्राथमिक शिक्षक समितीची सभा उत्साहात
गडहिंग्लज : येथील प्राथमिक शिक्षक समितीच्या कार्यकारणीची सभा उत्साहात झाली. शिक्षक नेते सतीश तेली अध्यक्षस्थानी होते. सरचिटणीस राजेंद्र नाईक यांनी स्वागत केले. शिक्षक समन्वय समितीच्या अध्यक्षपती निवड झाल्याबद्दल रवळू पाटील, शिष्यवृत्ती मार्गदर्शक रानबा नाईक, श्रीधर पाटील, मारुती घोलराखे, मधुकर जरळी यांचा सत्कार झाला. कार्यकारिणी शिक्षक नेतेपदी संजय चाळक, राजाराम नाईक यांची निवड झाली. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. जे. पी. नाईक शैक्षणिक व्यासपीठामार्फत होणाऱ्या उपक्रमांना बळ देण्याचा निर्णय झाला. भरत पाटील, रवळू पाटील, रामचंद्र सिताप, कृष्णा पाटील, सदाशिव कापसे, के. वाय. पाटील, शिवगोंडा खापरे, सुहास टक्केकर, प्रभाकर चौगुले, प्रकाश कुंभार, मारुती घोलराखे यांनी सहभाग घेतला. ------------------------------
फोटो क्रमांक : gad113.jpg
74691
कोल्हापूर : विजेत्या बुवाला पारितोषिक देताना डॉ. हेमानी चांदोलकर. शेजारी डॉ. गिरीश वझे व इतर.
--------------------------
अर्णव बुवा गायन स्पर्धेत प्रथम
गडहिंग्लज : येथील संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अर्णव बुवा याने राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. कोल्हापूरच्या दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे स्पर्धा झाली. डॉ. गिरीश वझे व डॉ. हेमानी चांदोलकर यांच्या हस्ते रोख वीस हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन अर्णवला गौरविले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी अर्णवचे अभिनंदन केले. शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य मच्छिंद्र बुवा, पर्यवेक्षक प्रा. टी. व्ही. चौगुले यांचे मार्गदर्शन मिळाले.