पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

नोकरीचे अमिष दाखवून महिलांची फसवणूक
कोल्हापूर ः एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनीस्टची नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तीन महिलांना फसवण्यात आले. याप्रकरणी विकास कुलकर्णी (पूर्णनाव, पत्ता माहिती नाही) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नोकरीची जाहिरात वाचून महिलांनी त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधाला तेव्हा संबंधित फिर्यादी आणि त्यांच्या साक्षीदार यांना कुलकर्णीने मोबाईल व्हॉटस् ॲपवरील ‘क्युआर कोड’ पाठवून पैशाची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी हिने तीन तर दोन्ही साक्षीदार महिलांनी त्याला एक आणि दोन हजार रुपये पाठविले. मात्र, नंतर नोकरीही लावली नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. २१ डिसेंबरला ही फसवणूक झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. याची नोंद आणि गुन्हा काल रात्री दाखल झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
-
हाणामारीत एकजण जखमी
कोल्हापूर, ः घर नावावर करून देण्याच्या कारणावरून सदरबाजारात झालेल्या हाणामारीत एक जखमी झाला असून, चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन जानेवारीला रात्री हा प्रकार घडला. याबाबत योव्हान देवदान चौगुले, योसेफ देवदान चौगुले, रोहित योव्हान चौगुले, अषिश योव्हान चौगुले (सर्व रा. सदर बाजार) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याची फिर्याद सुमित मोजस चौगुले यांनी काल शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
-
नवीन वाशी नाका येथे एकावर चाकू हल्ला
कोल्हापूर ः नवीन वाशी नाका येथील बिअर बारमध्ये दारु पिण्यासाठी आलेल्या व्यक्तीने टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्यामुळे त्याच्यावर चाकू हल्ला झाला. यामध्ये फिर्यादी हणमंत सिद्धराम बेने जखमी झाले. काल रात्री ही घटना घडली. जखमीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी शैलेश पाटील आणि त्याच्यासोबत असलेल्या एक अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.