देशसेवेसाठी युवकांनी योगदान द्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशसेवेसाठी युवकांनी योगदान द्यावे
देशसेवेसाठी युवकांनी योगदान द्यावे

देशसेवेसाठी युवकांनी योगदान द्यावे

sakal_logo
By

ajr111.jpg
74844
पेरणोली (ता. आजरा) ः येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जवान मोहिते यांचा सपत्नीक सत्कार करताना उषाताई जाधव. शेजारी उत्तम देसाई, आदी.
--------------------
देशसेवेसाठी युवकांनी योगदान द्यावे
प्रा. आबिटकर ः पेरणोलीत सेवानिवृत्तीनिमित्त जवान मोहिंतेचा सत्कार
आजरा, ता. ११ ः मोहिंतेसारखे देशातील खेड्यापाड्यातील सैन्यदलात असलेले तरुण सीमेवर दक्ष असल्यामुळे आपण सुरक्षित राहतो आहोत. शत्रूला अंगावर घेण्याची ताकद आपल्या वीरजवानांमध्ये आहे. त्यांचा आदर्श घेऊन युवकांनी देशसेवेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन प्रा. अर्जुन अबिटकर यांनी केले.
पेरणोली (ता. आजरा) येथे भारतीय सैन्यदलातील जवान विनोद केशव मोहिते यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार झाला. त्यांची गावातून सजवलेल्या जीपमधून जल्लोषी मिरवणूक काढली. देशभक्तिपर घोषणांनी वातावरण दणाणून गेले. धनगरी नृत्य, हलगीवादन, बँजोच्या निनादात वातावण देशभक्तीने भारावले होते. या वेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी प्रा. आबिटकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सरपंच उषा जाधव होत्या.
प्राचार्य अबिटकर म्हणाले, ‘‘जवान मोहिते यांनी ऊन, वारा, पाऊस आणि रक्त गोठवणारी थंडीच्या वातावरणात देशाच्या सीमेवर सेवा केली आहे. एकीकडे लहरी निसर्ग तर दुसरीकडे दबा धरून बसेलला शत्रू अशा परिस्थितही त्यांनी सीमांचे रक्षण केले आहे. वीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते कुटुंबात परतत आहेत. या क्षणाचे आम्ही सर्वजण साक्षीदार बनतोय हे आमचे भाग्य आहे.’’
सरपंच जाधव म्हणाल्या, ‘‘जवान मोहिते देशसेवेनंतर गावात परतले. पुढील काळात त्यांनी गावच्या विकासासाठी योगदान द्यावे.’’ माजी सभापती उदयराज पवार, उपसरपंच उत्तम देसाई, पत्नी विद्या मोहिते, गडहिंग्लज माजी नगरसेविका क्रांतिताई शिवणे, आजरा तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय मोहिते, गोविंद जाधव, उदय कोडक यांची भाषणे झाली.
माजी हावलदार दिनकर जाधव, सुभेदार सर्जेराव जाधव, कॅप्टन गोविंद केरकर, संदीप नावलकर, उज्वला मस्कर, प्रियांका जाधव, नंदा कांबळे, बाबासाहेब लोखंडे, अरुण जाधव, काका देसाई, प्रकाश मोहिते, किरण गुरव, अविनाश जोशिलकर, रामचंद्र. हळवणकर, दीपक लोखंडे, सूरज मुजावर, कृष्णा सासूलकर आदी उपस्थित होते. तानाजी देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. संजय मोहिते यांनी आभार मानले.