
गड-शहापूरकर पीएचडी
जनता दलाची
आज बैठक
गडहिंग्लज : संकेश्वर-बांदा रस्त्याबाबत जनता दलातर्फे उद्या (ता. १२) घरमालक, व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. पालिकेच्या शाहू सभागृहात दुपारी बाराला बैठक होईल. संकेश्वर-बांदा रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. शहरासह इतर गावांतून जाणाऱ्या रस्त्यामुळे नुकसान होणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आहे. माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होईल. बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी केले आहे.
---------------
gad118.jpg :
संतोष शहापूरकर
शहापूरकर
यांना पीएच.डी.
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाचे रजिष्ट्रार संतोष शहापूरकर यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळाली. त्यांनी प्रशासकीय व्यवहारातील मराठी भाषेचा अभ्यास (महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण संदर्भात) या विषयावरील प्रबंध सादर केला होता. श्री. शहापूरकर यांना २४ वर्षांच्या प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे. कनिष्ठ लिपिक ते रजिस्टार पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. ते महाराष्ट्र राज्य रजिस्टार संघाचे संघाचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांना डॉ. दत्ता पाटील, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन लाभले.