
सुमंगलमसाठी ८ कोटींचा निधी प्राप्त
सुमंगलम लोकोत्सवासाठी
८ कोटींचा निधी प्राप्तः माने
कोल्हापूर, ता. ११ : कणेरीमठ येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सुमंगलम लोकोत्सवासाठी शासनाकडून ८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला. आलेल्या निधीच्या खर्चाचे नियोजन करण्यासाठी तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांनी बैठक घेतली. या वेळी बांधकामचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर तसेच कणेरीमठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सुमंगलम लोकोत्सवास सर्व ती शासकीय मदत केली जाणार आहे. या बाबतीत मंगळवारी (ता. १०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली, तर २४ तास पूर्ण होण्याआधीच जिल्हा परिषदेकडे ८ कोटींचा निधी सुपूर्द केला. या रकमेतून शौचालय, रस्ते उभारणीचे काम होणार आहे. तसेच पार्किंग व्यवस्थेचाही काही भाग केला जाणार आहे.