भाकप मध्ये बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाकप मध्ये बैठक
भाकप मध्ये बैठक

भाकप मध्ये बैठक

sakal_logo
By

पानसरे स्मृती
जनजागृती
उपक्रम फेब्रुवारी

कोल्हापूर , ता. ११ ः ‘‘ ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनामागील सुत्रधारांचा शोध घ्यावा या मागणीसाठी डाव्या संघटनातर्फे १६ ते २० फेब्रुवारीला पानसरे स्मृती जनजागृती उपक्रम होणार आहेत. यात १६ फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे तर २० फेब्रुवारीला देशव्यापी मागणी अभियान होणार आहे.’’ अशी माहिती भाकपचे सचिव सतिश्चंद्र कांबळे यांनी दिली.
ॲड. पानसरे स्मृती जनजागृती सभेच्या नियोजनासाठी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ॲड. पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारीला हल्ला झाला तो दिवस मागणी दिवस पाळण्यात येणार आहे. खूनाचा तपास वेगाणे व्हावा तसेच सूत्रधार पकडला जावा यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार आहोत त्याचाच भाग म्हणून डाव्या पक्ष संघटना जनवादी संघटनांच्या सहभागाने ॲड. पानसरे स्मृती जागर कृती अभियान राबवणार आहोत. १६ फेब्रुवारीला जिल्हा मोर्चा, दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, १७ फेब्रुवारीला इचलकरंजी, १८ फेब्रुवारीला गारगोटी, १९ गडहिंग्लज येथे जाहिर सभा होतील, असेही कांबळे यांनी सांगितले.
दिलिप पोवार, मेघा पानसरे, उदय नारकर, रघुनाथ कांबळे, व्यंक्काप्पा भोसले, अतुल दिघे, बाबूराव कदम, रसिया पडळकर, बाळासाहेब पवार, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर आदी उपस्थित होते.