कॉमन पत्रके पत्रके

कॉमन पत्रके पत्रके

‘आयटीआय’तर्फे आवाहन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २०१६ पूर्वीचे अॅप्रेटिंसशिप परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अॅप्रेटिंसशिप प्रमाणपत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बीटीआरआय विभागामध्ये उपलब्ध आहे. संबंधितांनी ते कार्यालयीन वेळेत मुळ गुणपत्रिका आणि आयडेंटीटी प्रुफसह ३१ जानेवारी पूर्वी स्वतः उपस्थित घ्यावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य महेश आवटे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
------------
रेणुका भक्त संघटनेतर्फे १५ ला वार्षिक सभा
कोल्हापूर : माघ महिन्यातील सौंदत्ती यात्रा पाच फेब्रुवारीपासून होत आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी १६ तारखेला सकाळी दहा वाजता वार्षिक सभा होणार आहे. ही सभा मंगळवार पेठेतील सनगर गल्ली तालीम मंडळ हॉल, कोळेकर तिकटी नजीक येथे होईल. या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून दराची माहिती आणि चिक्कोडी विभागाकडून कर्नाटक एस.टी. दराविषयी माहिती दिली जाणार आहे. तसेच अहवाल, आर्थिक परिस्थिती विषयावर वार्षिक सभेचे कामकाज होईल. शिवाय संबंधित मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. तरी संघटनेच्या ग्रामीण भागातील सभासदांनी सभेस अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे पत्रक कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे, सरचिटणीस अच्युत साळोखे यांनी प्रसिध्द दिले आहे.
------------
‘भारती विद्यापीठ’तर्फे मदत
कोल्हापूर : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त तसेच विश्वजित कदम यांचा वाढदिवस असल्याने समाज प्रबोधन सप्ताह साजरा होत आहे. यासाठी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शाखेतर्फे मातोश्री वृध्दाश्रमास धान्य वाटप केले. शाखेचे संचालक डॉ. राजेश कंठे यांच्या हस्ते वाटप केले. संगणक विभागप्रमुख डॉ. के. एम. अलास्कर यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी पाटोळे यांनी माहिती दिली. याबरोबर देवी इंदुमती विद्यार्थी वसतीगृहाला धान्य वाटप केले. वसतीगृहाचे अधिक्षक राजाराम कांबळे यांनी वसतीगृहाबद्दल माहिती सांगितली. व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. पी. के. मुदाळकर, डॉ. एस. ए. मेमन, प्रशासकीय अधिकारी पृथ्वीराज पवार, कार्यालयीन अधिक्षक इंद्रजित देसाई, मुख्य लिपीक श्रीमती वैशाली पाटील उपस्थित होते. शाखेतर्फे कनिष्ठ लिपिक प्रशांत लाड यांनी प्रास्ताविक केले. शाखेतील शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
--------------
डिजीटल ग्रंथालयावर कार्यशाळा
कोल्हापूर : न्यू कॉलेज, भोगावती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन ग्रंथपाल संघटनेतर्फे ‘डिजीटल ग्रंथालय विकसित करताना वापरावयाची आज्ञावली’ यावर एकदिवशीय राष्ट्रीय कार्यशाळा झाली. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथील ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. सुनिता बर्वे यांनी महाविद्यालयीन ग्रंथपालान डिजीटल ग्रंथालय विकसित करताना डिस्पेस आज्ञावलीचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले प्रमुख उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. आडाव यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा. पी. एस. कल्लोळी यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. मीनाज नायकवडी यांनी आभार मानले. राष्ट्रीय कार्यशाळा ऑनलाईन पध्दतीने आयोजित केली होती. देशभरातून तीनशेहून अधिक महाविद्यालयीन ग्रंथपालांनी सहभाग नोंदवला.
-------------------
‘कळंबा गर्ल्स’मध्ये बाजाराचे आयोजन
कोल्हापूर : शालेय अभ्यासक्रमाबरोबर जीवनातील व्यवहारीक ज्ञान मिळावे, यासाठी कळंबा गर्ल्स हायस्कूल येथे आठवडा बाजाराचे आयोजन केले. खजानिनस एस. एस. आडसूळ यांनी उद्‌घाटन केले. मुख्याध्यापिका एस. ए. जाधव यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थिनींनी बाजारात विविध स्टॉलची मांडणी केली. यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या, शालेय वस्तू, इमिटेशन ज्वेलरीसाठी ठेवले होते. खाद्यपदार्थांचेही स्टॉल लावले होते. भेळ, पाणीपूरी, ओले शेंगदाणे, हरभरे, वडापाव आदी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर विद्यार्थिनींनी गर्दी केली होती. या बाजारास विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला. ए. डी. तिबिले यांनी नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com