Tue, Feb 7, 2023

भादवण येथे आज मार्गदर्शन
भादवण येथे आज मार्गदर्शन
Published on : 13 January 2023, 3:32 am
भादवण येथे आज मार्गदर्शन
भादवणः येथे प्रवीण कांबळे यांचा मार्गदर्शन कार्यक्रम शनिवारी (ता. १४) होत आहे. आदर्श विद्यामंदिर भादवणच्या पटांगणात रात्री आठ वाजता त्यांचा भादवण ग्रामस्थांकडून सत्कार होईल. आजरा तालुक्याचे तहसीलदार विकास अहिर व सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या हस्ते श्री. कांबळे यांचा सत्कार होईल. श्री. कांबळे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. एक तपाहून अधिक काळ श्री. कांबळे हे लंडन येथे अंतराळ क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी ब्रायटन विद्यापीठ इंग्लड येथे एअरोस्पेस इंजिनिअर व बॅचलर डिग्री संपादन केली आहे. मॅंचेस्टर विद्यापीठात त्यांनी मास्टर डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते ब्रिस्टल विद्यापीठातून डॉक्टरेटचे शिक्षण घेत आहेत.