आरपीएल क्रिकेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरपीएल क्रिकेट
आरपीएल क्रिकेट

आरपीएल क्रिकेट

sakal_logo
By

फोटो -
75410
कोल्हापूर : आपली फार्मसीचा खेळाडू निवास वाघमारे याला शुक्रवारी ‘सामनावीर’चे बक्षीस देताना विनोद कांबोज. शेजारी अशोक सुर्वे, सचिन कडवेकर, विकास जाधव, व्यंकटेश गायकवाड. (सर्व छायाचित्रे ः बी. डी. चेचर)
75408
कोल्हापूर : लाँगलाईफ चॅम्पियनचा खेळाडू धीरज पाटील याला ‘सामनावीर’चे बक्षीस देताना हेमंत पाटील. शेजारी दर्शन बोगार, संजय भगत.
75404
कोल्हापूर : माई ह्युंडाई सिद्धिविनायकचा खेळाडू शैलेश भोसले याला ‘सामनावीर’चे बक्षीस देताना राजेश आडके. शेजारी नामदेव गुरव, विशाल वडेर, रवी शिंदे, धीरज पाटील.
75406
कोल्हापूर : गोवा आरसीचा खेळाडू अशिष शिरोडकर याला ‘सामनावीर’चे बक्षीस देताना उदय मोरे. शेजारी संदीप साळोखे, सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, विनय कदम.
75405
कोल्हापूर : सकाळ माध्यम समूह व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित सकाळ रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट (आरपीएल) स्पर्धेत शुक्रवारी चाटे चॅम्पसचा फलंदाज विकास जाधव जोरदार फटका मारताना.
75407
कोल्हापूर : एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जच्या दीपक ठाकूरने लाँगलाईफ चॅम्पियनच्या आदर्श शेट्टीला पायचित केले तो क्षण.
11585
कोल्हापूर : सकाळ रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची फ्रॅंचायजी ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांच्याकडून स्वीकारताना अपोलो टायर्सचे भगवान सावंत. डावीकडून सकाळ इव्हेंटसचे साहाय्यक व्यवस्थापक सूरज जमादार, प्रीतेश कर्नावट, सत्यजित पाटील, मनीष कोटियाल.

११५८७
कोल्हापूर : लाँगलाईफ चॅम्पियनचे खेळाडू संजय कदम यांना ‘सामनावीर’चे बक्षीस देताना प्रदीप गांधी. शेजारी व्यंकटेश गायकवाड, शैलेश देशपांडे, संग्राम शेवरे, सचिन गाडगीळ.

चाटे चॅम्पस्, माई ह्युंडाई-सिद्धिविनायकचे विजय
गोवा आरसी, एमडब्ल्यूजी सुपरकिंग्ज, लाँगलाईफ चॅम्पियन, आपली फार्मसी गुणतक्त्यात आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : सकाळ रोटरी प्रीमियर लीग (आरपीएल) क्रिकेट स्पर्धेत लाँगलाईफ चॅम्पियन, माई ह्युंडाई सिद्धिविनायक, गोवा आरसी, एमडब्ल्यूजी सुपरकिंग्ज, चाटे चॅम्पसने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली. सकाळ माध्यम समूह व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे सकाळ रोटरी प्रीमियर लीग स्पर्धा शास्त्रीनगर मैदानावर सुरू आहे. ऋतुराज संजय पाटील फाऊंडेशन स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहे. हॉटेल पर्ल हॉस्पिटॅलिटी पार्टनर, तर अपोलो टायर्स असोसिएट पार्टनर आहेत.

लाँगलाईफ चॅम्पियनने अखेर विजय साकारला
लाँगलाईफ चॅम्पियनने ८ षटकांत ८७ धावांचे आव्हान आपली फार्मसीसमोर ठेवले. सलामीच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. नारायण गावडे ११, संग्राम सरनोबत ७, कर्णधार सचिन गाडगीळ ५ धावा करून तंबूत परतले. संजय कदम दुखापतीमुळे ७ धावा करून मैदानाबाहेर आले. त्यानंतर आदर्श शेट्टी व गौरव चव्हाण यांनी संघाचा डाव सावरला. आदर्शने ११ चेंडूंत २७ धावा फटकाविल्या. त्यात चार षटकारांचा समावेश होता. गौरवने त्याला उत्तम साथ देत ९ चेंडूंत २३ धावा कुटल्या. त्याने तीन षटकार खेचले. आपली फार्मसीकडून मृणाल परबने २ षटकांत २७ धावा देत दोन गडी बाद केले. प्रवीण काजवेने एका षटकांत १३ धावा देत एक गडी बाद केला.
आपली फार्मसीला ८७ धावांचे आव्हान पेलवले नाही. त्यांचे सलामीचे फलंदाज गडगडले. निवास वाघमारे शून्यावर, तर प्रवीण काजवे अवघ्या एका धावेवर बाद झाला. प्रीतेश कर्नावटने नऊ चेंडूंत ८ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आले नाही. सचिन गुंड एक धाव करू शकला. सुहास मिठारी १४ धावा करत दुखापतीमुळे मैदानाबाहेर पडला. व्यंकटेश गायकवाडने ११ चेंडूंत २० धावा केल्या. तो गौरव चव्हाणच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अमित केडगेला चार धावा करता आल्या. अभिनव वणकुद्रेने एक धाव केली. लाँगलाईफकडून संजय कदमने २ षटकांत १३ धावा देत तीन गडी बाद केले. संग्रामसिंह सरनोबत व गौरव चव्हाणने प्रत्येकी दोन गडी बाद केले. लाँगलाईफचा संजय कदम ‘सामनावीर’ ठरला.

माई ह्युंडाई सिद्धिविनायकचा धडाका
एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जने ८ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात ७२ धावा केल्या. कर्णधार नामदेव गुरवने १६ चेंडूंत २० धावा केल्या. जावेद महातने १३ चेंडूंत १९ धावा फटकाविल्या. दोघे दुखापतीने मैदानातून बाहेर आल्यानंतर धीरज पाटील मैदानात आला. त्याने १४ चेंडूंत नाबाद २३ धावा केल्या. धीरज ठाकूरने चार धावांचे योगदान दिले. माई ह्युंडाई सिद्धिविनायककडून योगेशने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल माई ह्युंडाई सिद्धिविनायकचे फलंदाज रवी मायदेव व शैलेश भोसले मैदानात उतरले. रवी मायदेव ७ चेंडूंत पाच धावांवर बाद झाल्याने खेळाडूंचे ठोके वाढले. दुसऱ्या बाजूला शैलेशने बाजू सावरताना ९ चेंडूंत आक्रमक २९ धावांची खेळी केली. त्याने चार षटकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर पुन्हा संघात अस्वस्थता निर्माण झाली. अतुल भगत ७ व सचिन कदमने २ धावा केल्या. योगेश करंदीकरने ९ चेंडूंत नाबाद १८ धावा करत संघाचा विजय साकार केला. कर्णधार रविराज शिंदेने ४ चेंडूंत ८, तर योगेशने नाबाद २ धावांचे योगदान दिले. माई ह्युंडाईने ६ षटके व ५ चेंडूंत ७३ धावा फटकावून सामना जिंकला. एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जकडून कर्णधार नामदेव गुरव, अमित, अजित जाधव व धीरज पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. माई ह्युंडाईचा शैलेश भोसले याला ‘सामनावीर’चे बक्षीस देण्यात आले.

गोवा आरसीकडून धावांचा पाऊस
गोवा आरसीने ८ षटकांत ९३ धावांचा पाऊस पाडला. त्यांचे सहा गडी बाद झाले. अशिष शिरोडकरने ११ चेंडूंत २७ धावांची जबरदस्त फलंदाजी केली. त्याने दोन षटकार व एक चौकार ठोकला. सचिन परांजपेने १५ चेंडूंत २६ धावा केल्या. कर्णधार सरगम फलारीने ६ चेंडूंत ९, दीपक प्रियोलकर ६ चेंडूंत १२, इम्तियाज शेख पाच चेंडूंत पाच, तर नीलेश मुळेने २ चेंडूंत नाबाद ७ धावा केल्या. चाटे चॅम्पकडून कर्णधार विकास जाधवने २ षटकांत १९ धावा देत दोन, तर रवीने २ षटकांत १८ धावा देत दोन गडी बाद केले. प्रसन्न सरदेसाईला एक गडी बाद करता आला. उत्तरादाखल चाटे चॅम्पने दिलेली झुंज वाखाणण्याजोगी ठरली. चाटे चॅम्पने ८ षटकांत सात गडी गमावून ८० धावा केल्या. समाधान दांडेकर ७ चेंडूंत ५, विजय पंदारे ५ चेंडूंत ६, प्रसन्न सरदेसाई २ चेंडूंत १ धावा काढून बाद झाल्यानंतर गोवा आरसीच्या अपेक्षा उंचावल्या. त्यानंतर राजू करूरने ९ चेंडूंत १०, तर सुशील काटकरने ३ चेंडूंत २ धावा केल्या. विशाल कल्याणकरकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. तो ३ चेंडूंत १० धावा करू शकला. सूरजने ११ चेंडूंत नाबाद १६ व विकास जाधवने ७ चेंडूंत २२ धावा फटकावून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यांना निर्धारित धावांचा पल्ला गाठता आला नाही. गोवा आरसीकडून अशिष शिरोडकरने २ षटकांत ११ धावा देत दोन, सचिन परांजपे, नीलेश मुळे, दीपक प्रियोलकरने प्रत्येकी एक गडी बाद केला. गोवा आरसीचा अशिष शिरोडकर ‘सामनावीर’चा मानकरी ठरला.

एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जची लाँगलाईफवर मात
लाँगलाईफ चॅम्पियनने ७ षटके ३ चेंडूंत दहा गडी गमावून ४० धावा केल्या. त्यांच्या नारायण गावडेने सर्वाधिक १२, तर आदर्श शेट्टीने ११ धावा केल्या. अन्य फलंदाजांना दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जकडून धीरज पाटीलने तीन, नामदेव गुरव, दीपक ठाकूरने प्रत्येकी दोन, तर अमित व जावेद महातने प्रत्येकी एक गडी बाद केला. एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जने ५ षटके ३ चेंडूंत ४३ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांचे तीन गडी बाद झाले. सलामीचे फलंदाज तंबूत लगोलग परत असताना डॉ. अभिजित कोराणेने १८ चेंडूंत नाबाद २८ धावा फटकावून विजय साकारला. लाँगलाईफकडून संग्रामसिंह सरनोबत व संजय कदमने प्रत्येकी एक गडी बाद केला.

आपली फार्मसीने चाटे चॅम्पसवर विजय मिळविला. आपली फार्मसीने ८ षटकांत एक गडी गमावून ८७ धावा केल्या. त्यांच्या निवास वाघमारेने २५ चेंडूंत ५० धावा फटकाविल्या. त्यात प्रत्येकी चार चौकार व षटकारांचा समावेश होता. प्रीतेश कर्नावटने ११, तर अमित केडगेने १४ धावा केल्या. चाटे चॅम्पसकडून मुकेश चुतानीने एक गडी बाद केला. उत्तरादाखल चाटे चॅम्पसला ८ षटकांत नऊ गडी गमावून ६१ धावा करता आल्या. राहुल कुलकर्णीने १५, तर समाधान दांडेकर व सूरजने प्रत्येकी १० धावा केल्या. आपली फार्मसीकडून मृणाल परबने तीन, प्रीतेश कर्नावटने दोन, तर प्रवीण काजवेने एक गडी बाद केला. आपली फार्मसीचा निवास वाघमारे ‘सामनावीर’ ठरला.

* आजचे सामने :
- गोवा आरसी वि. लाँगलाईफ चॅम्पियन - दुपारी १२.३०
- माई ह्युंडाई सिद्धिविनायक वि. चाटे चॅम्पस - २.००
- आपली फार्मसी वि. गोवा आरसी - ३.३०
- एमडब्ल्यूजी सुपरकिंग्ज वि. चाटे चॅम्पस - ५.००
- माई ह्युंडाई सिद्धिविनायक वि. लाँगलाईफ चॅम्पियन - ६.३०

* गुणतक्ता
* संघ * सामने * जिंकले * हरले * गुण
- गोवा आरसी - ३ - ३ - ० - ६
- एमडब्ल्यूजी सुपरकिंग्ज - ४ - २ - २ - ४
- लाँगलाईफ चॅम्पियन - ३ - २ - १ - ४
- आपली फार्मसी - ४ - २ - २ - ४
- माई ह्युंडाई सिद्धिविनायक - ३ - १ - २ - २
- चाटे चॅम्पस - ३ - ० - ३ - ०
---------------------
* टॉप स्कोअरर
- नारायण गावडे (लाँगलाईफ चॅम्पियन) - ७२
- अशिष शिरोडकर (गोवा आरसी) - ६९
- धीरज पाटील (एमडब्ल्यूजी सुपरकिंग्ज) - ६७
- सचिन परांजपे (गोवा आरसी) - ६४
- निवास वाघमारे (आपली फार्मसी) - ५५
---------------------
* टॉप विकेट टेकर
- धीरज पाटील (एमडब्ल्यूजी सुपरकिंग्ज) - ९
- नामदेव गुरव (एमडब्ल्यूजी सुपरकिंग्ज) - ७
- मृणाल परब (आपली फार्मसी) - ६
- संजय कदम (लाँगलाईफ चॅम्पियन) - ५
- विकास जाधव (चाटे चॅम्पस) - ५