खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावू ः मुख्यमंत्री शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावू ः मुख्यमंत्री शिंदे
खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावू ः मुख्यमंत्री शिंदे

खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावू ः मुख्यमंत्री शिंदे

sakal_logo
By

खंडपीठाचा प्रश्न लवकरच सोडवू

मुख्यमंत्री शिंदे : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे यासाठी येत्या आठ दिवसांमध्ये खंडपीठ कृती समितीसोबत बैठक घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शुक्रवारी (ता. १३) कोल्हापूर खंडपीठप्रश्नी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिले.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ९ जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला भेट दिली होती. या वेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश खडके, सचिव अॅड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी खंडपीठप्रश्नी शासनदरबारी पाठपुरावा करण्याची विनंती खोत यांना केली होती. यानुसार शुक्रवारी (ता. १३) माजी मंत्री खोत यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक झाली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांना पत्र पाठवून कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. तसेच कॅबिनेटमध्ये याबाबत ठराव झाला असून, अद्याप याबाबत कोणताच निर्णय झालेला नसल्याची माहिती खोत यांनी दिली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण कोल्हापूर खंडपीठ कृती समिती समवेत लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच या बैठकीस सहा जिल्ह्यातील वकिलांनाही निमंत्रित करणार असल्याचे सांगितले.