आप्पा पाटील, लाटवडे यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आप्पा पाटील, लाटवडे यांची निवड
आप्पा पाटील, लाटवडे यांची निवड

आप्पा पाटील, लाटवडे यांची निवड

sakal_logo
By

75480
आप्पा पाटील, लाटवडे यांची निवड
इचलकरंजी ः येथील श्रमशक्ती कामगार नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी आप्पा पाटील तर उपाध्यक्षपदी पोपट लाटवडे यांची निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी डी. डी. पोवार अध्यक्षस्थानी होते. संचालक सुकुमार कांबळे, जयश्री पाटील, मियाँखान मोकाशी, नागेश कांबळे, औदुंबर साठे, उत्तमे गेजगे उपस्थीत होते. निवडीनंतर समन्वयक अनिकेत पाटील यांच्याहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. शेखर कांबळे यांनी आभार मानले.
-------------
75481
विजय पतसंस्था अध्यक्षपदी बन्ने
इचलकरंजी ः येथील विजय सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सदाशिव बन्ने यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश राणे यांची बिनविरोध निवड केली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. पी. यू. माळी होत्या. बन्ने यांचे नाव अभय चौगुले यांनी सूचवले. त्यास तानाजी केसरे यांनी अनुमोदन दिले. राणे यांचे नाव पांडुरंग खावट यांनी सुचवले. त्यास राजगोंडा पाटील यांनी अनुमोदन दिले. संचालक कृष्णा माळी, महादेव मुधाळे, अजित टाळे, संचालिका वनिता मर्दाने, चिटणीस अमोल पाटील उपस्थीत होते. जयसिंग शिंदे यांनी आभार मानले.
-------------
75482
नामदेव पतसंस्था बिनविरोध
इचलकरंजी ः येथील नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी उमाकांत कोळेकर तर उपाध्यक्षपदी दीपक उरुणकर यांची निवड केली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी आर. जी. कुलकर्णी होते. कोळेकर यांचे नाव राजन उरुणकर यांनी सूचवले. त्यास विजय खटावकर यांनी अनुमोदन दिले. उरुणकर यांचे नाव कोळेकर यांनी सूचवले. गोपीनाथ बोंगाळे, योगेश नाझरे, चंद्रकांत पडवळकर, संजय गोंदकर, मनोज कांबळे, अशोक खोत, संचालिका सौ. मंगल गणबावले उपस्थित होते. सचिव राजाराम जिरगे यांनी आभार मानले.