इथेनॉल बिग स्टोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इथेनॉल बिग स्टोरी
इथेनॉल बिग स्टोरी

इथेनॉल बिग स्टोरी

sakal_logo
By

फोटो- 75808

बिग स्टोरी
-ओंकार धर्माधिकारी

सहकारी कारखान्यांनी वाढवावी
इथेनॉल निर्मितीची क्षमता

-ऊस उत्पादकाला मिळणार लाभ, कारखान्यांचा वाढणार नफा

कोल्हापूर, ता. १५ ः पेट्रोल आणि डिझेल यांना पर्याय म्हणून जगभर मान्यता पावलेल्या इथेनॉलच्या निर्मितीवर केंद्र सरकारने भर दिला आहे. इंथनातील याच्या मिश्रणाचे प्रमाणही वाढवले आहे. इथेनॉल निर्मिती करणारे कारखाने, पेट्रोलियम कंपन्या यांना अनुकूल धोरणही बनवले आहे. जिल्ह्यातही सहकारी आणि खासगी कारखान्यांनीही इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. मात्र, एकूण ऊस क्षेत्राच्या मानाने आपल्याकडे नगण्य इथेनॉल निर्मिती होते. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात १० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होत आहे. सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉलची निर्मिती वाढवल्यास कारखाने, शेतकरी सर्वांनाच याचा आर्थिक फायदा मिळणार आहे.

असे बनते इथेनॉल
इथेनॉल हे कार्बन, हायड्रोजन आणि हायड्रोक्साईल यापासून बनते. कार्बनची २ संयुगे, हायड्रोजनची ५ संयुगे आणि हायड्रोक्साईन असा इथेनॉलचा रायानिक फॉर्म्युला आहे. आपल्याकडे साखर निर्मितीतील मळीपासून इथेनॉल बनवतात. काही ठिकाणी आता थेट ऊसापासून इथेनॉल निर्मिती केली जाते. पण, त्याचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत अत्यल्प आहे. साखर कारखान्यांमध्ये ऊसाच्या रसापासून मळी बनवतात. त्या मळीपासून अल्कोहल बनते. इथाइन अल्कोहल म्हणजे इथेनॉल. यामध्ये ९५ टक्के इथेनॉल असतं तर ५ टक्के पाणी असते. निर्जलीकरणाची प्रक्रिया करून पाण्याचा अशं काढून टाकला जातो. त्यातून शंभर टक्के इथेनॉल तयार होतं. ऊसा व्यतिरिक्त मका, बीट, गहू यापासून इथेनॉल बनवले जाते.

ई.एफ.आर.पी संकल्पना
जैवइंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक शामराव देसाई पूर्वीपासून प्रयत्न करत आहेत. त्यांनी इथेनॉलबाबात केंद्र सरकारला काही माहिती निवेदनाच्या स्वरुपात दिली आहे. त्या माहितीनुसार, एक टन साखऱेपासून ६०० लिटर इथेनॉल तयार होते. अतिरिक्त निर्यात केलेल्या २८० टन साखरेचे १६८ लाख टन इथेनॉल होते. केंद्र शासनाचा घोषीत प्रतीलिटर दर ६३.४० दराने १६८ लाख टन इथेनॉलचे १ लाख ६ हजार ५१२ कोटी (१, ०६, ५१२) इतकी रक्कम होते. हा सारा हिशोब पाहता शेतकऱ्यांना प्रती टन ३ हजार ८०४ हजार रुपये एफ.आर.पी देता येईल, असा या संघटनेचा दावा आहे. यासाठी त्यांनी ई.एफ.आर.पी ही संकल्पना मांडली आहे.

साखर कारखान्यांना फायद्याचे
देशातील ३ पेट्रोलीयम कंपन्या इथेनॉल विकत घेतात. त्याचे दर शासनाने निश्चित केलेले आहेत. त्यामुळे निश्चित बाजारपेठ आहे. २१ दिवसात पैसे खात्यावर जमा होतात. वाहतुकीचा खर्च कंपनी देते. ऑनलाईन टेंडर पद्धतीमुळे पारदर्श कारभार. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना याचा नफा मिळतो.

मका, भातपासून इथेनॉल
जिल्ह्यात मका आणि भात या दोन्ही पिकांसाठी पोषक वातावरण असून, याचे उप्तादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ शकते. त्यामुळे धान्यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभे राहिले तर जिल्ह्यातील इथेनॉलचे उत्पादन वाढेल. सध्या देशात १२३ प्रकल्प हे धान्यापासून इथेनॉल निर्मिती करतात. खराब धान्यापासूनही इथेनॉल बनवता येऊ शकते.
-------------------------------------
चौकट
प्रमूख राज्यांची इथेनॉल मागणी (लिटरमध्ये)
महाराष्ट्र - ६५ कोटी ४२ लाख
उत्तर प्रदेश - ७१ कोटी २५ लाख
कर्नाटक - २३ कोटी ९८ लाख
तामिळनाडू - ३३ कोटी ११ लाख
-------------------------------------
इथेनॉलचे प्रकार आणि दर (प्रती लिटर)
बी हेवी मोलॅसिस - ६०.७५ रुपये
सी हेवी मोलॅसिस - ४७ रुपये
धान्यांपासून बनवलेले - ५५ रुपये
थेट ऊसापासून बनवलेले - ६५ रुपये
--
नकाशा वापरणे
जिल्ह्यातील ऊस क्षेत्र (हेक्टर)
हातकणंगले - ३७६०
शिरोळ - २७९६७
पन्हाळा - १४२१०
शाहुवाडी - ७५०४
राधानगरी - १२९१५
गगनबावडा - ३८३२
करवीर - २४०६०
कागल - २५७६६
गडहिंग्लज - १००५२
भुदरगड - ७१४०
चंदगड - १३५००
एकूण - १ लाख ७५ हजार ५६० हेक्टर


कोट
जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली असून, सध्या सुमारे १० साखर कारखाने इथेनॉलची निर्मिती करतात. अन्य साखर कारखान्यांनीही इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले असून, पुढील पाच वर्षात जिल्ह्यातील इथेनॉलचे उत्पादन अधिक वाढेल. इथेनॉलमुळे सहकारी साखर कारखान्यांचा नफा वाढणार आहे.
-पी.जी.मेढे , साखर उद्योगतज्ज्ञ

कोट
गुजरातमधील सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती करतात. त्यामुळे त्या कारखान्यांची एफ.आर.पीची रक्कम आपल्या जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांपेक्षा अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे अस्थिर दर पाहता इथेनॉल शेतकरी, कारखानदार सर्वांच्याच हिताचे आहे.
-शामराव देसाई, संस्थापक जैवइंधन शेतकरी संघटना