युके प्रोअॅक्टीव्हच्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युके प्रोअॅक्टीव्हच्या विद्यार्थ्यांचे यश
युके प्रोअॅक्टीव्हच्या विद्यार्थ्यांचे यश

युके प्रोअॅक्टीव्हच्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

यूके प्रोअॅक्टीव्हच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील युके प्रोअॅक्टीव्ह अबॅकस केंद्राच्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्पर्धेत यश मिळवले. कोल्हापूर येथे ही स्पर्धा झाली. गडहिंग्लज केंद्रातील १८ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह मिळाले. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ४४ विद्यार्थी पदकाचे मानकरी ठरले. गडहिंग्लजला उत्कृष्ट केंद्र म्हणून गौरवले. श्रद्धा मगदूम, प्रतीक्षा बंदी, सई देसाई, प्रांजल येळकर, साक्षी निर्वाणी, सारंग देसाई, शर्वरी केसरकर, श्रेया बिरंजे, प्रणव शिंदे, संचना कोरे, कनिष्का नाईकवाडी, सृष्टी नाईक, अर्नव नाईक, राहूल जाधव, जान्हवी माने, रुद्ध गोकाककर, आदित्य नाईक, रोहित चिलमी या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
--------------------------------
gad161.jpg :
75943
जयदीप सरनोबत

हसूरवाडी उपसरपंचपदी जयदीप सरनोबत
गडहिंग्लज : हसूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील उपसरपंचपदी अप्पी पाटील गटाचे जयदीप सरनोबत यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच कोमल भोसमोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड झाली. कृषी अधिकारी एस. एच. जजरवार यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले. सदस्य शुभांगी पाटील, सुनीता वाघराळकर, जयश्री कल्लोळी, अमित कांबळे, दिलीप घोटणे, संतराम वाघराळकर, मारुती करगावी, अशोक चव्हाण, अशोक पाटील, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब घोटणे, शंकर कांबळे आदी उपस्थित होते.
-----------------------------
gad162.jpg
75944
गडहिंग्लज : जागृती हायस्कूलमध्ये पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्रिया धनवडे. शेजारी विजय चौगुले व इतर.

जागृतीमध्ये भूगोल दिन
गडहिंग्लज : येथील जागृती हायस्कूलमध्ये भूगोल दिन साजरा केला. मुख्याध्यापक विजय चौगुले अध्यक्षस्थानी होते. प्रकाश गायकवाड यांनी स्वागत केले. श्री. चौगुले व विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रिया धनवडे यांच्याहस्ते पोस्टर प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. राजेंद्र पाटील, चंद्रशेखर देशपांडे, समीक्षा कापसे, सलमा सनदी, श्रावणी कडाकणे यांची भाषणे झाली. शिवाजी अनावरे, रवींद्र लोखंडे, देवनाथ महाले, प्रकाश हारकारे, मनोहर भोये, विलास वसाणे, विपुल गावीत आदी उपस्थित होते. भूमिका कुरळे हिने सूत्रसंचालन केले. पल्लवी मोदर हिने आभार मानले.
------------------------------
माध्यमिकच्या अध्यक्षपदी रमेश पाटील
गडहिंग्लज : येथील माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपती रमेश पाटील तर उपाध्यक्षपती वैभव शहा यांची निवड झाली. सहायक निबंधक कार्यालयाकडील सहकार अधिकारी सौ. आर. जे. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवडी झाल्या. अध्यक्षपदासाठी श्री. पाटील यांचे नाव संपत सावंत यांनी सूचविले. त्याला प्रकाश इंगळे यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी श्री. शहा यांचे नाव पांडुरंग पाटील यांनी सूचविले. त्याला दिनकर पाटील यांनी अनुमोदन दिले. सतीश रेडेकर, रवींद्र जांबोटकर, इनास कुटीन्हो, सयाजी भोसले, सुरेश रेडेकर, तुकाराम कांबळे, सुजाता नाईक, माधुरी पाटील, मारुती नाईक, रामय्या मठपती आदी उपस्थित होते.
-----------------------------
gad166.jpg
75955
गडहिंग्लज : भाजप दिव्यांग आघाडीतर्फे मागण्यांचे निवेदन श्री. भोसले यांना देताना दिव्यांग बांधव.
दिव्यांगांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
गडहिंग्लज : उत्पन्नाचे दाखले वेळेत मिळत मिळावेत यांसह विविध मागण्या भाजप दिव्यांग आघाडीतर्फे केल्या आहेत. प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले. तहसील कार्यालयाकडून दिव्यांग व्यक्तींना उत्पन्नाचे दाखले वेळेत मिळत नाहीत, ४० टक्के दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्यांना पेन्शन मंजूर करण्यास टाळाटाळ केली जात आहे, दिव्यांग व्यक्तींना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. वीरभद्र येडूरे, अनिल फुटाणे, दुंडाप्पा नावलगी, संजय कुंभार, संगीता संभोजी, करुणा पाटील, मारुती मोर्डी, संजय पोवार, समर्थ जाधव, रावसाहेब कोरे आदींनी हे निवेदन दिले.
---------------------------
शिवराज स्कूलमध्ये पतंग महोत्सव
गडहिंग्लज : येथील शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये पतंग महोत्सव झाला. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी राखाडी रंगाची वेशभूषा केली होती. शरद कांबळे यांनी मकर संक्रांत आणि पतंग महोत्सवाची माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आकाशात रंगबिरंगी पतंग सोडले. त्यांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला. मुख्याध्यापिका गौरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
----------------------------
gad167.jpg
75960
गडहिंग्लज : सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात कला सादर करताना विद्यार्थिनी.

सावित्रीबाई विद्यालयात स्नेहसंमेलन
गडहिंग्लज : येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. सकाळी विविध स्पर्धा झाल्या. माजी मुख्याध्यापक प्रकाश म्हेत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी विविध गुणदर्शन कार्यक्रम झाला. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संतराम कुंभार यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. प्रशासन अधिकारी आर. आर. कोरवी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा अंतर्गत लावणी, कोळीगीत, राष्ट्रभक्तिगीत, बालगीते सादर केली. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सायरा गायकवाड, मुख्याध्यापक विठ्ठल देसाई, मीनाक्षी शिरगावे, भारती कुंभार, रेश्मा नेवडे, अनिल खोपकर, संदीप बाबर, श्वेता कांबळे, भगवंता कांबळे आदी उपस्थित होते.
--------------------------
ओंकार महाविद्यालयात कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात कोरोना पश्चात विद्यार्थ्यांची मानसिकता या विषयावर कार्यशाळा झाली. समुपदेशन व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समितीतर्फे या कार्यशाळेचे आयोजन केले होते. प्रा. स्वयंप्रभा सरमगदूम अध्यक्षस्थानी होत्या. परवीन मकानदार, विद्या लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती. मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी विवेकाचा दंडाधिकारी सोबत ठेवा असा सल्ला लोहार यांनी दिला. कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. संजीवनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. कोमल बिरंबळे यांनी सूत्रसंचालन केले. सानिका घोटणे यांनी आभार मानले.
----------------------------
gad168.jpg
75961
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रतिमा पूजन प्रसंगी डॉ. मंगलकुमार पाटील, संदीप कागवाडे व प्राध्यापक.

घाळी महाविद्यालयात चौगुले यांना अभिवादन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात माजी विद्यार्थी शहीद पोलिस उपनिरीक्षक संजय चौगुले यांना अभिवादन केले. तेरा वर्षांपूर्वी मलकापूर (जि. बुलढाणा) येथे दरोडेखोरांशी झालेल्या चकमकीत संजय चौगुले शहीद झाले होते. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी प्रतिमा पूजन केले. प्रा. राजेंद्र सावेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पाटील यांनी चौगुले यांच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील, असे सांगितले. संदीप कागवाडे यांनी युवकांनी चौगुले यांच्या कर्तुत्वातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. शंकर मरगुद्री, उपप्राचार्य अनिल उंदरे, डॉ. दत्ता पाटील, प्रा. सचिन जानवेकर, डॉ. सरोज बिडकर, डॉ. नागेश मासाळ, डॉ. नीलेश शेळके आदी उपस्थित होते. डॉ. सरला आरबोळे यांनी आभार मानले.