मोकाट डुकरांचा लवकरच बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोकाट डुकरांचा लवकरच बंदोबस्त
मोकाट डुकरांचा लवकरच बंदोबस्त

मोकाट डुकरांचा लवकरच बंदोबस्त

sakal_logo
By

मोकाट डुकरांचा लवकरच बंदोबस्त
इचलकरंजी महापालिकेकडून २५ तारखेपर्यंत मुदत
इचलकरंजी, ता.१६ ः शहरात मोकाट फिरणाऱ्या डुकरांचा महापालिकेकडून लवकरच बंदोबस्त होणार आहे. त्यासाठी वराह मालकांना २५ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्यासाठी महापालिकेला संबंधित वराह मालकांना तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. अन्यथा उद्या (ता.१७) पासूनच डुकर पकडण्याची मोहिम महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे.
शहरात मोकाट डुकरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अस्वच्छतेमध्ये भर पडत आहे. तसेच नागरिकांवर हल्ला करण्यासह अपघात होत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आज वराहमालकांची बैठक आयोजीत केली होती. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तातडीने मोकाट डुकरांची व्यवस्था बंदिस्त जागेत न केल्यास कारवाई करण्याची संबंधितांना समज दिली. याबाबत मुदत देण्याची मागणी वराह मालकांनी केली.
यावर चर्चा झाल्यानंतर २५ जानेवारीपर्यंत मोकाट डुकरांची व्यवस्था करण्याची त्यांना मुदत दिली. मात्र त्यासाठी वराह मालकांचे प्रतिज्ञापत्र महापालिकेकडून घेतले जाणार आहे. जे वराह मालक प्रतिज्ञापत्र तातडीने देणार नाहीत, त्यांच्या परिसरातील डुकरे पकडण्याची तातडीने मोहिम राबवण्यात येईल, असा इशारा दिला. त्यानुसार आरोग्य विभागाकडून प्रतिज्ञापत्र भरुन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील काळात मोकाट डुकरांचा उपद्रव थांबण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात आज महापालिकेत झालेल्या बैठकीस आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार उपस्थीत होते.