
तारदाळला ग्रामरत्न पुरस्काराचे वितरण
76304
------------
तारदाळला ग्रामरत्न पुरस्काराचे वितरण
तारदाळ, ता. १८ : कलाकार म्हणून घडत असताना शंकर पाटील यांच्या ‘धिंड’ कथेमुळे मला शालेय जीवनात पहिले पारितोषिक मिळाले होते. आणि तेथूनच खऱ्या अर्थाने विनोदी अभिनयाची सुरुवात झाली. या दिग्गज साहित्यिकाच्या गावात येऊन मला या ग्रामस्थांचे हितगुज जाणता आले हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर यांनी केले.
तारदाळ येथे आयोजित केलेल्या ग्रामरत्न पुरस्कार वितरण व व्याख्यानमालेत ते बोलत होते. पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, ‘जीवनात सतत केलेल्या संघर्षाची, केलेल्या कामाची पोचपावती आयुष्यातील एखाद्या सन्मानाने भरून निघत नाही, त्यासाठी तुम्हाला आत्मिक बळ देणाऱ्या व्यक्ती ही महत्त्वाच्या असतात.’ आमदार प्रकाश आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी साहित्य प्रेमी युवा मंचच्या साहित्यिक उपक्रमाचे कौतुक केले. पोलिस निरीक्षक अभिजित पाटील, अशोकराव माने, अंजना शिंदे, चंद्रकांत चौगुले, सचिन पोवार, अमर खोत, के. जी. पाटील, प्रकाश खोबरे आदी उपस्थित होते. डी. पी. भगत व गजानन खोत यांनी प्रास्तावीक केले. कार्यकमाचे संयोजन व नियोजन दिलीप खोत, विश्वनाथ मांजरे, जितेंद्र आणुजे यांनी केले.