
औषधी रानभाज्या खंड - १ पुस्तकाचे प्रकाशन
‘औषधी रानभाज्या
खंड १’ पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर, ता. १७ ः ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर आणि आयुर्वेदाचार्य डॉ. अशोक वाली यांनी लिहिलेल्या ‘औषधी रानभाज्या खंड १’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. शाहू स्मारक येथे झालेल्या कंदमुळे महोत्सवात प्रकाशन सोहळा झाला. पुस्तकात रानभाज्यांच्या प्रजाती, त्यांचे औषधी उपयोग यासह अन्य माहिती आहे.
निसर्ग अंकुर, कोल्हापूर सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. पुस्तकात रोप व वेलवर्गीय, झुडूपवर्गीय आणि कंदमुळवर्गीय अशा ६५ रानभाज्यांची माहिती दिली आहे. रानभाजीचे शास्त्रीय नाव, विविध भाषांमधील नावेही दिली आहे. रानभाजी कुठे आढळते, फुले, पाने, फळांबाबतची माहितीही दिली आहे. त्यांची छायाचित्रेही आहेत. आयुर्वेदाप्रमाणे रानभाजीचे औषधी उपयोगही तसेच रानभाज्यांच्या पाककृतीही पुस्तकात आहेत. पुस्तक प्रकाशनाला कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलींद धोंड, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, डॉ. डी. आर. मोरे, कृषी अधिकारी उमेश पाटील, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, जयेश ओसवाल, मंजिरी कपडेकर, कल्पना सावंत, डॉ. दोशी, अमृता वासुदेवन, प्रा. किशोर शिंदेंसह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.