
जाहिरात- डेक्कन इन्स्टिट्यूट
76357
कोल्हापूर ः डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सच्या वतीने टॅक्स कन्सल्टंट अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचे वितरण झाले. या वेळी आर. एस. टोपकर, उदय सुतार, मल्हार भेंडिगिरी आदी.
डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ
कॉमर्सतर्फे प्रमाणपत्र वितरण
कोल्हापूर, ता. १७ ः डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सच्या येथील शाखेतर्फे टॅक्स कन्सल्टंट अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राचे वितरण झाले. कर सल्लागार आर. एस. टोपकर, उदय सुतार, सीए मल्हार भेंडिगिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. संस्थेला एकशे तीन वर्षे पूर्ण झाली असून गेली सोळा वर्षे येथे हा अभ्यासक्रम दोन सत्रात सुरू आहे. या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र प्रतिष्ठेचे असून त्यामुळे अनेकांना नोकरी आणि बढती मिळाल्या असल्याचे गौरवोद्गार या वेळी टोपकर यांनी काढले. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचे भवितव्य अतिशय उज्वल असल्याचे श्री. भेंडिगिरी म्हणाले.
सुतार यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश कसे मिळवले, याबाबतची विविध उदाहरणे सांगितली. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यातील तरूणांसाठी प्राचार्य डॉ. वासुदेव देशिंगकर यांनी हा अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही झाले. केवळ दोन सत्रात हा अभ्यासक्रम असल्याने अनेकांना प्रवेश घेता येत नसल्याची खंत डॉ. देशिंगकर यांनी व्यक्त केली. शाहूपुरीतील स्टार टॉवर्समधील सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला. राजशेखर शेट्टी, रेश्मा चौगले, महेश माने, अक्षय जाधव, स्नेहलता इनामदार, गौरी पाटील, स्नेहल माने, प्रशांत जाधव, वैभव डुबुले, दीपक कंदले उपस्थित होते. ॲड. प्रसन्न देशिंगकर यांनी सूत्रसंचालन केले.