स्वयंम शाळेच्या बळकटीसाठी दातृत्वांनी सहकार्य करावे; राहुल रेखावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वयंम शाळेच्या बळकटीसाठी दातृत्वांनी सहकार्य करावे; राहुल रेखावर
स्वयंम शाळेच्या बळकटीसाठी दातृत्वांनी सहकार्य करावे; राहुल रेखावर

स्वयंम शाळेच्या बळकटीसाठी दातृत्वांनी सहकार्य करावे; राहुल रेखावर

sakal_logo
By

76485
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे कसबा बावडा येथील स्वयंम शाळेत ई-लर्निंग सुविधेच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.

स्वयंम शाळेच्या बळकटीसाठी
दातृत्वांनी सहकार्य करावे
राहुल रेखावर; ई-लर्निंगची सुविधेचे उद्‍घाटन
कोल्हापूर, ता. १८ : ‘स्वयंम ही दिव्यांग मुलांची शाळा असून शाळेची वाटचाल चांगल्या पद्धतीने सुरू आहे; मात्र शाळेच्या आणखी बळकटीकरणासाठी समाजातील दातृत्वांनी पुढे यावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे कसबा बावडा येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी कोल्हापूर शाखा संचलित स्वयंम शाळा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पंधरा लाख रुपये खर्च करून आठ वर्गांत ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली. यामध्ये लॅपटॉप, टीव्ही, सॉफ्टवेअर अशा साहित्याचा समावेश आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास होण्यासाठी शाळेच्या आवारात ‘सेन्सरी उद्यान’ ही उभे केले आहे. या उपक्रमांचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
रेखावार यांनी रोटरी सनराईज संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्य मोलाचे असल्याचे सांगितले. रोटरी सनराईजचे माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी उपक्रमांची माहिती दिली.
स्वयंम स्कूलच्या अध्यक्षा शोभा तावडे यांनी रोटरी सनराईजने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. रोटरी सनराईजचे सचिव दिव्यराज वसा, विक्रांतसिंह कदम, प्रसन्न देशिंगकर, राहुल आर. कुलकर्णी, सचिन झंवर, राजूभाई परीख, चंद्रकांत राठोड, इंद्रजित दळवी, डॉ. सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
रोटरी सनराईजचे अध्यक्ष ऋषिकेश खोत, सचिव राहुल एस. कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रोटरी इंटरनॅशनल आणि रोटरी जिल्हा ३१७० तर्फे माजी प्रांतपाल गौरीश धोंड, विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे, भावी प्रांतपाल नासीर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारे, माजी सहाय्यक प्रांतपाल करुणाकर नायक, विद्यमान सहाय्यक प्रांतपाल सुभाष कुत्ते, अजय मेनन उपस्थित होते. स्वयंम शाळेचे उपाध्यक्ष अमर पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव सतीशराज जगदाळे यांनी आभार मानले.