
हेरेमध्ये २०७ रुग्णांची तपासणी
gad188.jpg
76489
हेरे : देसाई हॉस्पिटल व ग्रामपंचायतीतर्फे झालेल्या आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉ. चंद्रशेखर देसाई.
----------------------------
हेरेमध्ये २०७ रुग्णांची तपासणी
गडहिंग्लज, ता. १८ : येथील देसाई हॉस्पिटल कार्डिअॅक केअर सेंटर व हेरे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने हेरे येथे हृदयरोग, मूत्ररोग व नेत्ररोग निदान शिबीर झाले. शिबिराला प्रतिसाद मिळाला. २०७ रुग्णांची तपासणी केली. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर देसाई, कार्डिआलॉजिस्ट डॉ. रोहित देसाई, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. दिशा राणे-देसाई, युरॉलॉजिस्ट डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली. सरपंच जयश्री गावडे, उपसरपंच विशाल बल्लाळ, ग्रामपंचायत सदस्य सुरज जांबरेकर आदी उपस्थित होते. डॉ. जी. एम. पाटील, डॉ. हेमंत पाटील, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. चंद्रकांत शिंदे, डॉ. सुनील पाटील, सुरज नाईक यांचे सहकार्य मिळाले.