
सुपर अभिनवतर्फे टॅलेंट हंट परीक्षा
gad189.jpg
गडहिंग्लज : सुपर अभिनव ॲकॅडमीतर्फे झालेल्या बक्षीस वितरणप्रसंगी संदीप पाटील, एस. बी. पाटील, डॉ. अमोल पाटील आदी.
--------------------------
सुपर अभिनवतर्फे टॅलेंट हंट परीक्षा
गडहिंग्लज, ता. १८ : येथील सुपर अभिनव सायन्स ॲकॅडमीतर्फे टॅलेंट हंट परीक्षा उत्साहात झाली. अकॅडमीतर्फे नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी परीक्षेचे आयोजन केले होते. गडहिंग्लजसह आजरा व चंदगड तालुक्यातील सुमारे २०० विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांना ॲकॅडमीच्या शुल्कात सवलत दिली आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण केले. विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाचे (सांगली) प्राचार्य संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुपर अभिनवचे संचालक एस. बी. पाटील, डॉ. अमोल पाटील यांचीही भाषणे झाली. पालक कृष्णा बारवेलकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले.