
भरतीत १०१ उमेदवार अपात्र
राज्य राखीव दलाच्या पोलिस शिपाई
भरतीत १०१ उमेदवार अपात्र
कोल्हापूर, ता. १८ः राज्य राखीव दलाच्या पोलिस शिपाई भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी आलेल्यांपैकी आज १०१ उमेदवार अपात्र ठरले. छाती, उंची यामध्ये अनेक उमेदवार रिंगणातून बाहेर गेले. भरतीच्या आजच्या तिसऱ्या दिवशीही एक हजार उमेदवारांना बोलविले होते. पैकी ७१४ उमेदवार आज प्रत्यक्षात हजर होते, असे सहाय्यक समादेशक ए. पी. लिपारे यांनी सांगितले. राज्य राखीव दलाच्या पोलिस शिपाई भरतीसाठी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे. आजच्या तिसऱ्या दिवशीही पहाटेपासून प्रक्रिया सुरू झाली. छाती, उंची, वजन आणि कागदपत्रे पाहिल्यानंतरच उमेदवारांना क्रमांक दिला जात होता. त्यावरून त्यांच्या नोंदी घेतल्या जात होत्या. शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक पोलिस मुख्यालयातील मैदानावर झाले, तर ५ किलोमीटर धावण्यासाठी कसबा बावडा ते शिये रस्त्यावर चाचणी घेण्यात आली. दोन फेब्रुवारीपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे आरएफआयडी या पद्धतीनुसार प्रक्रिया सुरू आहे.