कागलला ‘रामराज्य’ चे स्वप्न पूर्ण होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागलला ‘रामराज्य’ चे स्वप्न पूर्ण होईल
कागलला ‘रामराज्य’ चे स्वप्न पूर्ण होईल

कागलला ‘रामराज्य’ चे स्वप्न पूर्ण होईल

sakal_logo
By

gad195.jpg
76710
गडहिंग्लज : वाढदिवसानिमित्त समरजित घाटगे यांचा सत्कार करताना गडहिंग्लज शहर आणि तालुका भाजपाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते.
--------------------------------------------------
कागलला ‘रामराज्य’ चे स्वप्न पूर्ण होईल
समरजित घाटगे; गडहिंग्लजला वाढदिनी घाटगेंचा भाजपातर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : सहा वर्षापूर्वी गडहिंग्लज व उत्तूर परिसरात सुरु केलेल्या संघटन बांधणीला आज वटवृक्षाचे स्वरुप आले आहे. यामुळे आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून कागल मतदारसंघात ‘रामराज्य’ आणण्याचे कार्यकर्ते आणि जनतेचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, असा विश्‍वास समरजित घाटगे यांनी आज येथे व्यक्त केला.
गडहिंग्लज शहर आणि तालुका भाजपाच्यावतीने वाढदिवसानिमित्त समरजित घाटगे यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. गिजवणेचे आण्णासाहेब पाटील-खातेदार अध्यक्षस्थानी होते. श्री. घाटगे म्हणाले, ‘मतदारसंघात कार्यकर्त्यांची चांगली फळी तयार झाली आहे. केवळ आमदार करण्यासाठी नव्हे तर सर्व जातीधर्मांना सोबत घेवून जाण्यासाठी जनतेने आता मूठ बांधली आहे.’
दरम्यान, घाटगेंच्या आमदारकीसाठी आज सकाळी अजित जामदार यांच्यातर्फे महायज्ञ घातला. कार्यक्रमापूर्वी दसरा चौकातून मोटरसायकल रॅलीने श्री. घाटगे यांचे स्वागत झाले. यावेळी परशराम तावरे, उमेश देसाई, अनिता चौगुले, प्रितम कापसे, संजय धुरे, सोनाली बिद्रे-कदम, वामन बिलावर यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, दत्तात्रय बरगे, प्रकाश पाटील, विठ्ठल भमानगोळ, अनिल खोत, सतीश हळदकर, शैलेंद्र कावणेकर, अनुप पाटील, अजित जामदार, रवींद्र घोरपडे, अनिल मोरे, शहाजी पाटील, संग्राम घाटगे, गणपतराव डोंगरे, संजय बटकडली आदी उपस्थित होते.