विशाळगड निवेदन

विशाळगड निवेदन

विशाळगडावरील अनधिकृत
शेडप्रकरणी कारवाई करा

शिवदुर्ग संवर्धन आंदोलनातर्फे ‘पुरातत्त्व’ला निवेदन

कोल्हापूर, ता. २० ः विशाळगडावरील अहिल्याबाईंच्या समाधिस्थळ परिसरात अनधिकृत शेड उभारले जात आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही काम सुरूच राहिले. हे अनधिकृत शेड उभारणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन शिवदुर्ग संवर्धन आंदोलनातर्फे पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालकांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, सोळा जानेवारीला छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशाळगडावर आल्यानंतर शेडबाबत समजले. त्याबाबत संबंधितांना विचारणा केली असता कोंबडे कापण्यासाठी हे शेड उभारले जात असल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहूवाडी तहसीलदारांना काम तत्काळ थांबवण्याच्या सूचना केल्या. मात्र, तरीही काम न थांबवता, पुरातत्त्व खात्याची कोणतीही परवानगी न घेता येथे खोदाई केली गेली आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाईची गरज असून पुरातत्त्व विभागाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, याबाबत लेखी माहिती मिळावी.
निवेदनावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, अमित आडसुळे, प्रदीप हांडे, विजय दरवान, प्रज्वल गोडसे, यश मंडलिक, देवेंद्र सावंत आदींच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com