Fri, Jan 27, 2023

गड-व्यापारी नागरी पतसंस्था
गड-व्यापारी नागरी पतसंस्था
Published on : 22 January 2023, 2:20 am
गडहिंग्लज व्यापारी नागरी सहकारी
पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. सहायक निबंधक अमित गराडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अकरा जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध निवड झालेले संचालक असे- विश्वनाथ पट्टणशेट्टी, अरुण तेलंग, सदाशिव रिंगणे, सुरेश आजरी, जितेंद्र कोरी, गुरुप्रसाद यरटे (सर्वसाधारण गट), संतोष भोपळे (अनुसूचित जाती जमाती गट), सिद्धार्थ गाताडे (इतर मागासवर्गीय गट), यलाप्पा धनगर (भटक्या जाती विमुक्त जमाती गट), लक्ष्मी घुगरे व दीपाली पट्टणशेट्टी (महिला राखीव गट).