बॅडमिंटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅडमिंटन
बॅडमिंटन

बॅडमिंटन

sakal_logo
By

77392

आडसूळ, डॉ. पाटील यांना विजेतेपद
महापालिकेतर्फे बॅडमिंटन स्पर्धा; एकेरीत प्रियांका साजणे विजयी

कोल्हापूर, ता. २२ ः महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत ‘डबल’मध्ये उपायुक्त रविकांत आडसूळ व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय पाटील यांना विजेतेपद मिळाले. ‘सिंगल’मध्ये डॉ. विजय पाटील, तर महिला सिंगलमधून सहायक शिक्षिका प्रियांका साजणे विजयी झाले.
महापालिका अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यासाठीच्या बॅडमिंटन स्पर्धेतील सिंगल, डबलमधील उपांत्य व अंतिम सामने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचे उपस्थितीत आज झाले. या स्पर्धेत ५० हून अधिक महापालिका अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक व पत्रकार यांनी भाग घेतला.
सिंगल (पुरुष)चा पहिला उपांत्य सामना उपायुक्त रविकांत आडसूळ व ‘सकाळ’चे मुख्य बातमीदार निवास चौगले यांच्यात झाला. त्यात आडसूळ विजयी झाले, तर दुसरा उपांत्य सामना माजी नगरसेवक राहुल माने व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्यात झाला. त्यातून डॉ. पाटील विजयी झाले. त्यामुळे अंतिम सामना आडसूळ विरुद्ध डॉ. पाटील यांच्यात होऊन डॉ. पाटील विजयी झाले. ‘डबल’चा अंतिम सामना उपायुक्त आडसूळ व डॉ. पाटील विरुद्ध माजी नगरसेवक माने व पत्रकार चौगले यांच्या संघात झाला. त्यात आडसूळ व पाटील विजयी झाले. सिंगल (महिला) मध्ये सहायक शिक्षिका वंदिता महाडिक उपविजेत्या ठरल्या.