शिवसेना शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना शिबिर
शिवसेना शिबिर

शिवसेना शिबिर

sakal_logo
By

शहरात आज १२ ठिकाणी आरोग्य शिबिर
कोल्हापूर, ता. ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त उद्या (ता. २३) शहरात १२ ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. आजही प्रत्त्येक शिवसैनिकाने शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची मशाल तेवत ठेवली आहे. कै. ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा जपला जातो. याचाच एक भाग म्हणून या शिबिरांचे आयोजन केले आहे. सकाळी दहा ते दुपारी चार यावेळेत शिबिर होईल. महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ रुग्णालयांच्या सहभागाने विविध आजारांवरील तपासण्या व उपचार यात होणार आहेत. या शिबिरात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ठ रुग्णालयांचे विविध आजारांवरून वर्गीकरण करून प्रत्येक ठिकाणी ४ ते ५ रुग्णालयांच्या वैद्यकीय पथकास विविध आजारांशी निगडीत तपासणी, औषधोपचार करणार आहेत.