मराठी साहित्य अभिवाचन गुरूवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी साहित्य अभिवाचन गुरूवारी
मराठी साहित्य अभिवाचन गुरूवारी

मराठी साहित्य अभिवाचन गुरूवारी

sakal_logo
By

जागतिक मराठी साहित्य
अभिवाचन स्पर्धा गुरुवारी

कोल्हापूर, ता. २३ ः चाळीसगावच्या रंगगंध कलासक्त न्यासतर्फे पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव यंदापासून जागतिक स्तरावरही होत आहे. महाराष्ट्रात २० ठिकाणी प्राथमिक फेरी होणार असून येथील फिनिक्स क्रिएशन्स या संस्थेमध्ये गुरुवारी (ता.२६) सकाळी दहापासून प्राथमिक फेरी रंगणार आहे.
परराज्यातील आणि परदेशातील स्पर्धक संघांसाठी प्राथमिक फेरीसाठी २५ ते ३० मिनिटांचा व्हिडिओ थेट रंगगंध कलासक्त न्यासकडे पाठवून सहभागी होता येणार आहे. अशी संमिश्र अभिवाचन स्पर्धा पहिल्यांदाच होत आहे. स्पर्धेमध्ये दोन ते पाच कलाकरांनी कुठल्याही साहित्य प्रकाराचे २५ ते ३० मिनिटांचे साहित्य अभिवाचन करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये कथा, कविता, आत्मवृत्त, वैचारिक लेख, प्रवास वर्णन तसेच संमिश्र साहित्यकृतीचे एका विषयाला अनुसरून नाट्यात्मक अनुभूती देणारे अभिवाचन सादर करायचे आहे. मात्र, नाटक किंवा एकांकिका सादर करता येणार नाही. प्राथमिक फेरीत आलेल्या स्पर्धक संख्येनुसार एक किंवा दोन संघ अंतिम फेरीत पोचतात. अंतिम फेरी चाळीसगाव येथे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. अंतिम फेरीत आलेल्या स्पर्धक संघांना प्रवास खर्च, निवास व भोजनाची सोय ‘रंगगंध'' संस्थेतर्फे केली जाते. स्पर्धेमध्ये सुमारे ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धा ऐकण्यासाठी सर्वांसाठी खुली असल्याची माहिती फिनिक्स क्रिएशन्सचे अध्यक्ष संजय मोहिते आणि कार्याध्यक्षा डॉ. राजश्री खटावकर यांनी दिली.