फादर अग्नेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी भरवला बाजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फादर अग्नेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी भरवला बाजार
फादर अग्नेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी भरवला बाजार

फादर अग्नेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी भरवला बाजार

sakal_logo
By

chd233.jpg
77722
चंदगड ः फादर अग्नेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या बाजाराचे उद्‍घाटन करताना फादर विल्सन पॉल आदी.
---------------------------------------------
फादर अग्नेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी भरवला बाजार
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २३ ः येथील फादर अग्नेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी प्रापंचिक गरजेच्या वस्तूंबरोबरच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडून बाजार भरवला. मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल यांच्या संकल्पनेतून हा बाजार भरवला होता. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाजारपेठ, व्यवहारज्ञान व्हावे हा हेतू होता.
फादर पॉल व पालकांच्याहस्ते बाजाराचे उद्‍घाटन केले. पॉल म्हणाले, ‘केवळ पुस्तकी ज्ञान परीपूर्ण विद्यार्थी घडवत नाही. त्यासाठी कृतीशील प्रात्यक्षिकाची गरज असते. पैशाचा व्यवहार कशाप्रकारे चालतो. एखादी वस्तू विक्री करण्याचे कौशल्य कसे आत्मसात करावे हे प्रत्यक्ष बाजारात शिकायला मिळते. विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान होणे गरजेचे आहे.’ पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्टेशनरी, बेकरी पदार्थ, फळे, भाजीपाला, किराणा साहित्य, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडले होते. त्यातून देवघेव, सुट्ट्या पैशाची तजवीज कशी करायची याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. फादर मिलाग्रेस आदी उपस्थित होते.