पानसरे हत्या - सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पानसरे हत्या - सुनावणी
पानसरे हत्या - सुनावणी

पानसरे हत्या - सुनावणी

sakal_logo
By

गोविंद पानसरे हत्याप्रकरण ... लोगो
...

सरकारपक्षातर्फे पंचनाम्यांची
सूची न्यायालयात सादर

गायकवाडला हजेरीत सूट देण्याची मागणी ः ७ फेब्रुवारीला पुढील सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील सुनावणीवेळी आज सीआरपीसी २९४ प्रमाणे एकूण ४३ साक्षीदारांची, पंचनाम्यांची सूची आज न्यायालयात सादर करण्यात आली. पुढील सुनावणीत यादीवर संशयित आरोपींच्या वकिलांनी, आरोपींनी आक्षेप घेतल्यास प्रत्यक्षात साक्षीदार तपासणी आणि उलट तपासणी सुरू होणार आहे. पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला होईल. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.
दरम्यान, पानसरे हल्ल्‍यातील पहिला संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या पायाची शस्त्रक्रिया होणार आहे. सध्या त्याची प्रत्येक रविवारी दहशतवादविरोधी पथकाकडे हजेरी असते. त्यातून सूट मिळावी, असा अर्ज आज आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सादर केला. तसेच आजही तो हजर राहू शकला नाही, त्याही गैरहजेरीला मंजुरी द्यावी, असाही एक अर्ज सादर केला.
गोविंद पानसरे यांच्यासह पत्नी उमा यांच्यावर गोळीबार झाला. त्यानंतर आजपर्यंत एकूण १२ संशयित आरोपी असल्याचे विशेष तपास पथकाने (एसआयटी) दोषारोप पत्रामधून स्पष्ट केले आहे. पैकी दोन अद्याप फरार आहेत. गतवेळच्या सुनावणीमध्ये आरोपींवर दोषनिश्‍चिती करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दोषनिश्‍चिती झाल्यानंतर आजच्या सुनावणीत सीआरपीसी २९४ प्रमाणे गुन्ह्यातील तपासातील ४३ पंचनाम्यांची साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली. प्रत्येक पंचनाम्यात दोन साक्षीदार आहेत. या पंचनाम्यांच्या यादीमध्ये गोळीबार झालेल्या घटनेच्या पंचनाम्यासह जप्त कपडे, शवविच्छेदन अहवाल, घर झडती, वैद्यकीय अहवाल, जप्त केलेल्या वस्तू अशा सर्वांचा समावेश आहे. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकरसुद्धा पुढील सुनावणीला हजर राहणार असल्याचेही ॲड. राणे यांनी सांगितले.
दरम्यान, संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयात अर्ज देऊन पहिला संशयित गायकवाडच्या पायाची शस्त्रक्रिया करायची आहे. त्यामुळे प्रत्येक रविवारी येथील दशहतवादविरोधी पथकाकडे देण्यात येणाऱ्या हजेरीतून दोन महिने सूट द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच आज तो हजर नसल्यामुळे त्याला सवलत देण्यात यावी, असे दोन अर्ज दाखल केले. दोन्हीबाजूकडील म्हणणे ऐकल्यानंतर न्यायाधीश श्री. तांबे यांनी पुढील सुनावणी ७ फेब्रवारीला होईल, असे जाहीर केले.