मॉर्निंग वॉकर्सना मनोरूग्ण फिरस्त्यांची धास्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉर्निंग वॉकर्सना मनोरूग्ण फिरस्त्यांची धास्ती
मॉर्निंग वॉकर्सना मनोरूग्ण फिरस्त्यांची धास्ती

मॉर्निंग वॉकर्सना मनोरूग्ण फिरस्त्यांची धास्ती

sakal_logo
By

मॉर्निंग वॉकर्सना
मनोरुग्ण फिरस्त्यांची धास्ती
---
रमण मळा परिसरातील दांपत्यावर दगड घेऊन हल्ला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः शहर आणि परिसरातील काही ठिकाणी फिरस्त्या मनोरुग्णांची धास्ती वाढली आहे. विशेषतः सकाळी फिरायला जाणाऱ्या मॉर्निंग वॉकर्सना त्यांच्या विविध करामतींना सामोरे जावे लागत आहे. रमण मळा परिसरात आज सकाळी फिरायला गेलेल्या दांपत्यावर एका मनोरुग्णाने थेट हातात दगड घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या दांपत्याने प्रसंगावधनता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, यानिमित्त अशा फिरस्त्या मनोरुग्णांपासून नागरिकांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
संबंधित दांपत्याने झालेल्या हल्ल्यातून प्रसंगावधानता दाखवत याबाबतची माहितीही पोलिसांनाही दिली आणि पोलिसांच्या मदतीनेच साऱ्या परिसरात त्याची शोधमोहीम राबवली. पण, अखेर हा मनोरुग्ण पसार झाला. शहराच्या उपनगरातील काही ठिकाणी रात्रीच्या वेळीही फिरस्त्यांकडून थेट वाहनांच्या आडवे येण्याचे प्रकार घडत आहेत. त्याशिवाय, त्यांचे रस्त्यावरील जागेच्या वादातून परस्परांमध्ये वादाचे मोठे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आता होत आहे.

कोट
फिरस्त्या मनोरुग्णांबाबत सहानुभूती हवीच. त्यांना नागरिकांनी जाणीवपूर्वक त्रास देऊ नये. पण, ते असे हल्ले करीत असतील तर नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना द्यायला हवी. पोलिस प्रशासन त्यांच्याबाबत योग्य ती कार्यवाही नक्की करेल.
- राजेश गवळी, पोलिस निरीक्षक, शाहूपुरी