पत्रकांच्याही बातम्या पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकांच्याही बातम्या पत्रके
पत्रकांच्याही बातम्या पत्रके

पत्रकांच्याही बातम्या पत्रके

sakal_logo
By

ध्वजवंदनावेळी डॉ. आंबेडकरांच्या
प्रतिमेचे पूजन करावे : सदानंद डिगे
कोल्हापूर : ध्वजवंदनावेळी (ता. २६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करावे, असे आवाहन माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी पत्रकाद्वारे केले. पत्रकातील माहितीनुसार, आपला भारत देश विविध जात, धर्म, पंथ, भाषा, संस्कृतींनी विखुरलेला होता. तो भारतीय घटनेच्या रुपाने एकसंध झाला. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी परिश्रमाने भारतीय घटना तयार केली. ती २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला बहाल केली. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटना अमलात आली. खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात आली. म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन होय. देशातील आताच्या नवीन पिढीला याची जाणीव आणि घटनेबद्दलची माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी शाळा, कॉलेज, संस्था, मंडळे, कार्यालयात ध्वजवंदनावेळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माहिती द्यावी.
...

चिश्तियाँ सरकार यांचा उरूस शनिवारपासून
कोल्हापूर : हजरत पीर सय्यद चिश्तियाँ सरकार यांचा उरूस शनिवारपासून (ता. २८) सुरू होत आहे. उरसानिमित्त २८ ला रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी गंधरात्र, नूर-ए-मेहफील होणार आहे. रविवारी (ता. २९) मुख्य गलेफ मिरवणूक सहा वाजून १५ मिनिटांनी होईल. गलेफ पूजन हे हजरत पीर शहाजमाल कलंदर (बाबुजमाल दर्गा) येथे होऊन मिरवणूक मार्ग हा बाबुजमाल दर्ग्यातून पूजन होऊन गुजरी, ताराबाई रोड, महाद्वार रोड, भवानी मंडप, बिंदू चौक, आझाद चौक, दिलबहार तालीम मंडळ हजरत पीर सय्यद चिश्तियाँ सरकार दर्ग्यामध्ये येऊन गलेफ घालून फातीहा खानी होईल. त्यानंतर प्रसाद (लंगर) होईल, अशी माहिती दिलबहार तालीम मंडळाचे अध्यक्ष विनायक फाळके, खादिम विनायक माने, खादिम सलमान दस्तगीर कामते यांनी पत्रकाद्वारे दिली.
...
गोंदवलेकर महाराज पादुका मंदिरात जयंत्युत्सव
कोल्हापूर : कपिलतीर्थ येथील सद्‌गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पादुका मंदिरात २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत जयंत्युत्सव होणार आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबुराव ठाणेकर यांनी केले आहे. (स्व.) गंगुबाई रेंदाळकर-कुलकर्णी यांनी १९२० मध्ये कपिलतीर्थ मार्केटशेजारील वाड्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या पादुकांचे मंदिर स्थापन केले. तेव्हापासून प्रतिवर्षी ठाणेकर कुटुंबीयांकडून जयंत्युत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी प्रवचने, हरि कीर्तने, आरती, महाप्रसाद होईल. रोज सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत प्रवचनकार डॉ. कांचन जोशी, अशोकराव कौलवकर, उदय घायाळ, बाळकृष्ण चौगुले, हिंदुराव भोईटे, विनय कुलकर्णी, आबा देसाई यांची नाम महात्म्य विषद करणारी प्रवचने होतील. ६.३० ते ९ या वेळेत गजानन बुवा यांची कीर्तने होतील. गुरुवारी (ता. २) सकाळी नऊ वाजता जन्मकाळ होणार असून दुपारी १२ वाजता आरती, महाप्रसाद होईल, अशी माहिती ठाणेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
...
शाहू ज्येष्ठ संघातर्फे आज सभा
कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे मासिक सभा बुधवारी (ता. २५) सायंकाळी चार वाजता बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्र, टाऊन हॉल येथे होत आहे. प्रा. विजय ककडे हे ‘ज्येष्ठांचे अर्थपूर्ण जीवन’ यावर मार्गदर्शन करतील. ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष डी. एस. घोलराखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
...
विद्यापीठ हायस्कूलमध्ये केळवकर दिन
कोल्हापूर : विद्यापीठ हायस्कूलमध्ये केळवकर दिन साजरा झाला. विद्यापीठ सोसायटीचे अध्यक्ष विकास जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठ सोसायटीचे उपाध्यक्ष किरण रेडेकर प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठ हायस्कूलचे पहिले मुख्याध्यापक (कै.) यशवंतराव केळवकर यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. मुख्याध्यापिका सलोनी पाटील हिने प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली. १९९३-९४ मधील माजी विद्यार्थी शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्था, पुणेचे अध्यक्ष अभय कोटकर यांनी संवाद साधला. प्रशासन अधिकारी प्रदीप मगदूम, उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, उपप्राचार्या के. व्ही. भानुसे, ए. डी. कशाळकर उपस्थित होते. व्ही. सी. शिंदे, के. एन. गावडे, एस. के. महाजन यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापक ओम अंबपकर यांनी आभार मानले.
...
78034
कोल्हापूर : कोल्हापूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला.

कोल्हापूर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा
कोल्हापूर : कोल्हापूर हायस्कूलच्या १९८५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा ११ वा स्नेहमेळावा हॉटेल इंदिरासागर येथे झाला. एस. व्ही. रेडेकर यांनी हजेरी घेतली. माजी मुख्याध्यापक एस. डी. पुजारी, माजी नगरसेवक मधुकर रामाणे उपस्थित होते. श्रीकांत मनोळे यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले. पी. ए. पाटील, बी. डी. पाटील, एस. एल. गडकरी, व्ही. डी. पाटील, एस. डी. पाटील, एस. एस. गड्डी, मुख्याध्यापक व्ही. डी. हिरेमठ, एस. पी. संकपाळ, दीपक पाटील, अशोक पाटील, नामदेव मोरे, अमर कागलकर, सरला पोवार, शांता पाटील, सुनिता पुंगावकर, आशा मोरे, नितीन पाटणकर, आनंदा पाटील उपस्थित होते. रफीक जमादार यांनी स्वागत केले. सुरेश बोडेकर यांनी आभार मानले.
...
राजर्षी शाहू महाराज हायस्कूलमध्ये मेळावा
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये २०११-१२ मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा झाला. संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. विद्यार्थ्यांनी शाळेसाठी शालेय फलक भेट स्वरूपात दिला. मुख्याध्यापिका महानंदा कदम, बी. जी. सावंत, श्री. वाडेकर, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
...
श्री विद्या मंदिरात किलबिल बाजार
कोल्हापूर : श्री विद्या मंदिर येथे किलबिल बाजार घेण्यात आला. पालक आसिरा नदाफ यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. मुख्याध्यापक आप्पासाहेब वागरे यांनी बाजार भरवण्याबाबतचा उद्देश सांगितला. शिक्षिका सुरेखा गुरव, तृप्ती जाधव, नम्रता पोहाळकर उपस्थित होत्या. बाजारात विद्यार्थ्यांनी भेळ, समोसे, विविध भाज्या, खेळणी, स्टेशनरी वस्तू, कपडे, खाऊचे पदार्थ ठेवून विक्री केली. अक्षय गुरव यांनी आभार मानले.