Thur, Feb 9, 2023

लिफ्ट बंदबाबत भाजप आक्रमक
लिफ्ट बंदबाबत भाजप आक्रमक
Published on : 24 January 2023, 2:12 am
ich248.jpg
78042
इचलकरंजी ः शिवतीर्थवरील बंद पडलेल्या लिफ्टबाबत उपायुक्त प्रदीप ठेंगल यांच्याशी भाजप कार्यकर्त्यांनी चर्चा केली.
लिफ्ट बंदबाबत भाजप आक्रमक
इचलकरंजी ः शिवतीर्थवरील बंद पडलेल्या लिफ्टबाबत आज भाजपने आक्रमक भूमिका घेतली. महापालिका उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना निवेदन देवून याबाबतचा रोष व्यक्त केला. तातडीने लिफ्टची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी त्यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांना सादर केले. २७ जानेवारीपर्यंत महापालिका प्रशासनाला अल्टीमेटम दिले असून त्यानंतर मोठे जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी दिला. यावेळी अरुण कुंभार, अमर कांबळे, सतीश पंडित, किसन शिंदे, प्रवीण पाटील, अमित जावळे, प्रमोद बचाटे, प्रदीप मळगे, सागर कचरे आदी उपस्थित होते.