रस्ते निवेदन

रस्ते निवेदन

‘डांबरी प्रकल्प योग्य ठिकाणी उभा करून
ठेकेदारांना माल घेण्याची सक्ती करा’

सर्वपक्षीय रस्ते समन्वय कृती समितीची मागणी

कोल्हापूर, ता. २४ ः महापालिकेचा डांबरी प्रकल्प योग्य ठिकाणी उभा करून महापालिकेच्या ठेकेदारांना तिथूनच डांबरी माल घेण्याची सक्ती करावी. त्यातून मालाची गुणवत्ता, प्रमाणावर देखरेख राहू शकते. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारून वारंवार खर्च करावा लागणार नाही, असे कोल्हापूर शहर सर्वपक्षीय रस्ते समन्वय कृती समितीने सांगितले. दरम्यान, रस्त्यांच्या कामांबाबत महापालिका उद्या माहिती देणार असून, त्यानंतर २६ जानेवारी रोजीच्या घेराओबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे ॲड. इंदुलकर यांनी सांगितले.
रस्त्यांबाबत आज महापालिकेत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याशी समितीने चर्चा केली. यावेळी ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने रस्त्यांसाठी काहीही केलेले नाही. विशेषतः ई वॉर्डमध्ये गॅस पाईपलाईनच्या नावाखाली रस्ते खणले गेले. त्या कंपनीकडून पैसे मिळूनही त्या रस्त्यांचे रिस्टोरेशन झालेले नाही. जिथे रस्ते केले ते निकृष्ट दर्जाचे होते. रस्त्याखालील सेवा वाहिन्यांचे नकाशे तयार केले पाहिजेत. पवडी विभागातून ज्या कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे, त्यांना पुन्हा पवडी विभागात आणावे. रस्त्याच्या कामांमध्ये घोटाळे झाले तर पहिली कडक कारवाई नियंत्रक अधिकाऱ्यांवर व्हायला हवी. पवडी विभागामध्ये काही कर्मचारी, अधिकारी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ आहेत. त्यामुळे विशेषतः मुकादमांच्या बदल्या त्वरित होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com